शेफाली वर्माचा नेदरलँड्सविरूद्ध विक्रम (फोटो सौजन्य - Instagram)
या अर्धशतकाव्यतिरिक्त, शफालीने गोलंदाजीनेही कहर केला. तिने ३.२ षटकांत केवळ २० धावा देऊन तीन बळी घेतले. त्यापूर्वी तिने ३८ चेंडूंमध्ये ५५ धावा केल्या होत्या. यासह, शफाली टी-२० विश्वचषक सामन्यात अर्धशतक आणि तीन बळी घेणारी जगातील केवळ तिसरी खेळाडू ठरली. शेफालीच्या आधी, हा पराक्रम २०१८ मध्ये वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूजने श्रीलंकेविरुद्ध केला होता. मॅथ्यूजने त्या सामन्यात ६२ धावा केल्या आणि तीन बळी घेतले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या सुने लुसने २०२० मध्ये थायलंडविरुद्ध ६१ धावा आणि तीन बळी घेत हा पराक्रम केला.
IND W Vs NED W Live: स्मृती अन् शेफालीची ‘हाय व्होल्टेज’ बॅटिंग! टीम इंडियाने ठोकल्या २०९ रन्स
कसा होता खेळ
या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ५ गडी गमावून २०९ धावांचा डोंगर उभा केला. मंधाना आणि शेफाली व्यतिरिक्त, रिचा घोषने २० धावा आणि जेमिमा रॉड्रिग्जने १९ धावांचे योगदान दिले. कर्णधार हरमनप्रीत कौरने १२ धावा आणि दीप्ती शर्माने १० धावा केल्या. नेदरलँड्सकडून कॅरोलिन डी लँगने ४ षटकांत ३२ धावा देऊन २ बळी घेत सर्वाधिक बळी घेतले, तर मिर्थ व्हॅन डेन राड, हेदर सीगर्स आणि आयरीस झ्विलिंग यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला.
नेदरलँड्सची फलंदाजी अपयशी ठरली
भारताच्या २०९ धावांना प्रत्युत्तर देताना नेदरलँड्सची फलंदाजी अत्यंत सुमार ठरली. कर्णधार बॅबेट डी लीडने संघासाठी सर्वाधिक २८ धावा केल्या. हेदर सेगर्सने २१ धावा, तर स्टेर कॅलिसने १८ धावांचे योगदान दिले. या तिघींव्यतिरिक्त नेदरलँड्सची संपूर्ण फलंदाजी कमकुवत दिसत होती. गोलंदाजी विभागात, शफाली वर्माने टीम इंडियासाठी तीन बळी घेतले, तर श्री चरणीने चार षटकांत १९ धावा देऊन चार बळी घेतले. नंदिनी शर्माने दोन, तर दीप्तीने एक बळी घेतला.
IND W Vs NED W Live: श्री चरणीच्या फिरकीपुढे नेदरलँड्स ढेपाळलं; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय






