क्रांती गौड(फोटो-सोशल मिडिया)
Women’s ODI World Cup 2025 : नुकतीच आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा संपली. जगाला भारतीय रूपाने एक नवा जगज्जेता मिळाला. महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिका महिला संघाचा ५२ धावांनी पराभव केला आणि पहिले विश्वचषक विजेतपदावर नाव कोरले. या भारतीय संघातील काही महिला खेळाडूंवर त्यांच्या संघर्षाच्या काळात टीका देखील करण्यात आली. त्यातीलच एक खेळाडू वेगवान गोलंदाज क्रांती गौडला देखील अशाच अनुभवायला सामोरे जावे लागले. याबबत तिने मोठा खुलासा केला.
मध्य प्रदेशातील घुवारा गावातील रहिवासी असलेली भारतीय वेगवान गोलंदाज क्रांती गौड हिने खुलासा केला की, एकेकाळी तिला माहितही नव्हते की भारताचा महिला क्रिकेट संघ आहे. २२ वर्षीय या खेळाडूने नुकत्याच संपलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषकात १८.५५ च्या सरासरीने नऊ विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील तीन विकेट्सचा समावेश आहे.
हेही वाचा : प्रतिका रावलला मेडल दिल्यामुळे जय शाह यांना गोष्ट खटकली!icc चे अध्यक्ष घेणार मोठा निर्णय
भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पहिल्यांदाच वर्ल्डकप जिंकला. गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यापूर्वी एका व्हिडिओद्वारे गौर म्हणाली, मला माहितही नव्हते की महिला क्रिकेट संघ आहे.इथूनच माझा क्रिकेटमधील प्रवास सुरू झाला. मला खूप अभिमान वाटतो. कारण हा माझा पहिला विश्वचषक होता आणि आता आम्ही विश्वविजेते आहोत. ही माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. क्रांतीची कहाणी स्टेडियमच्या फ्लडलाइट्स आणि कॅमेऱ्यांपासून खूप दूर सुरू झाली. ती बहुतेकदा मुलांना दुरून खेळताना पाहत असे आणि जेव्हा जेव्हा चेंडू तिच्याकडे येत असे तेव्हा ती तो परत फेकत असे. एके दिवशी, जेव्हा मुलांना खेळाडूची गरज होती तेव्हा तिला अचानक प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले.
क्रांती पुढे म्हणाली की, जेव्हा मी त्यांच्यासोबत खेळायला सुरुवात केलीतेव्हा त्यांनी मला फक्त क्षेत्ररक्षक म्हणून खेळवले, परंतु हळूहळू मी खेळायला शिकले. मला स्पिन बॉलिंग असे काही असते हे देखील माहित नव्हते. म्हणून, मी मुलांना पाहिल्यानंतर जलद बॉलिंग करायला सुरुवात केली. राजीव बिल्थरेचा उल्लेख करताना ती म्हणाली, मग मी लेदर बॉल स्पर्धा खेळले आणि राजीव सरांना भेटले. राजीव बिल्थरे छतरपूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव देखील होते आणि त्यांना क्रांतीची बॉलिंगची गती खूपच प्रभावी वाटली. त्यांनी मला विचारले की, मला आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील खेळायचे आहे का. मला माहित नव्हते की आंतरराष्ट्रीय मुलींचा संघ आहे आणि नंतर ते मला त्यांच्या अकादमीत घेऊन गेले. सहा महिन्यांच्या आत, मी वरिष्ठ विभागात खेळले आणि एका वर्षांच्या आत, मी वडोदरा येथील राज्याच्या स्थानिक १९ वर्षांखालील संघासाठी पदार्पण केले.
मी एका लहान गावातून येते, म्हणून मुलींना तिथे खेळण्याची परवानगी नव्हती. माझे कुटुंब विचारायचे, तुम्ही तिला मुलांसोबत का खेळू देत आहात?’ मग मी विचार केला, एक दिवस मी सर्वांना माझ्या कामगिरीचे कौतुक करायला लावेन, आणि जे मला आणि माझ्या कुटुंबाला टोमणे मारायचे ते आता आमचे कौतुक करत आहेत. आता महिला संघातही सुधारणा होत आहे आणि विश्वचषक जिंकल्यानंतर ते खूप पुढे जाईल. तरुण वेगवान गोलंदाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या तिच्या भेटीची एक खास आठवणही सांगितली. क्रांती म्हणाली, मी त्यांना सांगितले की माझा भाऊ तुमचा खूप मोठा चाहता आहे. पंतप्रधान हसले आणि म्हणाले, मी लवकरच तुमच्या भावाला नक्कीच भेटेन.






