वर्ल्ड बॉक्सिंग कपमध्ये भारताचा 'सोनेरी' चौकार(फोटो-सोशल मीडिया)
मीनाक्षी हुडाने गुरुवारी वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्ये पहिल्या सुवर्णपदकावर नाव कोरले. तिने महिलांच्या ४८ किलो गटात उझबेकिस्तानच्या फरझोना फोझिलोवाचा दमदार पराभव केला आणि इतिहास घडवला.
हेही वाचा : ‘मुलाला दुबईत सोडून, मी…’, शोएब मलिकपासून वेगळे झाल्याबद्दल सानिया मिर्झाने व्यक्त केली वेदना
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल २०२५ मध्ये मीनाक्षी हुडाने फोझिलोवाचा ५-० च्या फरकाने मोठा पराभव केला. सुवर्णपदक जिंकल्यानंतर मीनाक्षी म्हणाली की, “मी सुरुवातीला घाबरले होते, पण नंतर मी गर्दी पाहून उत्साह निर्माण झाला. देशासाठी सुवर्णपदक जिंकल्याबद्दल मला आनंद झाला आहे.”
याशिवाय, प्रीती पनवारने २०२५ च्या विश्वचषकातील कांस्यपदक विजेत्या इटलीच्या सिरीन चाराबीला पराभूत हरवून सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या ५४ किलो वजनी गटात प्रीतीने सिरीनवर जोरदार मुक्का मारले आणि पूर्ण नियंत्रणासह सुवर्णपदकावर नाव कोरले.
हेही वाचा : कोलकाता खेळपट्टी वाद! गौतम गंभीर आणि ईडन गार्डन्स क्युरेटर पुन्हा भिडले? वाचा सविस्तर
यानंतर, भारताच्या अरुंधती चौधरीने देखील आपला दम दाखवत उझबेकिस्तानच्या अझीजा झोकिरवाला धूळ चारत सुवर्णपदकांची कमाई केली. त्यानंतर नुपूर शेओरनने महिलांच्या ८०+ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या ओल्टिनॉय सोटिम्बोएवाला पराभूत करत भारताच्या खात्यात चौथे सुवर्णपदक टाकले.
भारताची स्टार बॉक्सर निखत जरीनने वर्ल्ड बॉक्सिंग कप २०२५ मध्ये सुवर्णपदक जिंकत भारताच्या खात्यात पाचवे सुवर्णपदक जमा केले. गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात निखतचा सामना चिनी तैपेई बॉक्सर जुआन यी गुओशी झाला. ५१ किलो वजनी गटात निखतने उत्कृष्ट पंच आणि वेगाने तिच्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले आणि राष्ट्रीय ध्वज अभिमानाने फडकवला.
अंदाजे १५०,००० लोकसंख्या असणाऱ्या कुराकाओ देशाने पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात स्थान मिळवून इतिहास रचला आहे. जमैकाशी गोलरहित बरोबरी साधल्यानंतर कुराकाओने पहिल्यांदाच विश्वचषकासाठी पात्रता मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. यामुळे विश्वचषकासाठी पात्र ठरणारा तो सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश ठरला आहे. यापूर्वी, आइसलँड हा विश्वचषकासाठी पात्र ठरणारा सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश होता. रशियामध्ये २०१८ च्या विश्वचषकासाठी पात्र ठरला तेव्हा त्याची लोकसंख्या अंदाजे ३५०,०००होती.






