फोटो सौजन्य - UP Warriorz सोशल मीडिया
वूमेन्स प्रीमियर लीग २०२५ : सोमवारी महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळवण्यात आला. दमदार फॉर्ममध्ये असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर युपीने पराभूत केले आहे. या सामन्यात आरसीबीला सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत आरसीबीचा हा सलग दुसरा पराभव आहे. आरसीबीला पराभूत केल्यानंतर, यूपी वॉरियर्सने पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. त्याचबरोवर गुणतालिकेमध्ये मोठा फेरबदल पाहायला मिळाला आहे.
यूपी वॉरियर्सकडून पराभव पत्करावा लागला असला तरी, स्मृती मानधनाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत, त्यापैकी २ सामने जिंकले आहेत आणि २ मध्ये पराभव पत्करला आहे. आरसीबीचे ४ गुण आहेत, परंतु संघाच्या चांगल्या नेट रन रेटमुळे आरसीबी पहिल्या स्थानावर कायम आहे. त्याच वेळी, मुंबई इंडियन्सचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स संघाचे आतापर्यत ३ सामने झाले आहेत. यामध्ये त्यांनी १ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता तर उर्वरित दोन सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे.
ABSOLUTE SCENES IN BENGALURU!!! 🔥🔥🔥#UPWarriorz #RCBvUPW pic.twitter.com/W8IMu9Qxqx — UP Warriorz (@UPWarriorz) February 24, 2025
याशिवाय, युपी वॉरियर्सची स्पर्धेमध्ये सुरुवात खराब झाली पण आता त्यांनी सलग दोन सामने जिंकल्यानंतर, यूपी वॉरियर्स संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. यूपी वॉरियर्सचेही ४ गुण आहेत. जर आपण दिल्ली कॅपिटल्सबद्दल बोललो तर, संघाने ४ सामने खेळले आहेत, त्यापैकी २ सामने जिंकले आहेत आणि २ मध्ये पराभव पत्करला आहे. दिल्ली कॅपिटल्स सध्या चौथ्या स्थानावर आहे, तर गुजरात जायंट्स पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे.
Here are the winners of the #CurvvSuperStriker of the Match, #SintexSixesoftheMatch and #HerbalifeActiveCatchOfTheMatch awards 👌👌@TataMotors_Cars | @Sintex_BAPL_Ltd | #SintexTanks | @Herbalife #TATAWPL | #RCBvUPW pic.twitter.com/irNXtOaHC5 — Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 24, 2025
आज महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. गुजरात या स्पर्धेत दुसऱ्या विजयाच्या शोधात आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सला तिसरा विजय मिळवून त्यांचा नेट रन रेट सुधारायचा आहे. हा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता खेळला जाईल.
या स्पर्धेमध्ये ५ संघ सहभागी झाले आहेत, यांमधील तो ४ संघ सेमीफायनलचे सामने खेळातील तर विजयी संघ अंतिम फेरीचा सामना खेळणार आहेत. फायनलचा सामना १५ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे.