फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांमध्ये टीम इंडियाने यजमान संघाला धूळ चारली आहे. या विजयासह भारताच्या संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे तर पाकिस्तानच्या संघाला सेमीफायनलच्या शर्यतीमधून बाहेर काढले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. न्यूझीलंड आणि भारताकडून त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव पत्करल्यानंतर संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधून लीग टप्प्यातच बाहेर पडला. संघाला आता आणखी एक धक्का बसला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आता सपोर्ट स्टाफमध्ये बदल करण्याची योजना आखत आहे, जिथे ते संघाचे मुख्य प्रशिक्षक आकिब जावेद यांना काढून टाकण्याची तयारी करत आहे.
गेल्या वर्षी गॅरी कर्स्टन यांना काढून टाकल्यानंतर पीसीबीने आकिब जावेद यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. पीटीआयने पीसीबीच्या एका सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, “चॅम्पियन्स ट्रॉफीमधील संघाच्या कामगिरीवर टीका होत आहे हे स्पष्ट आहे. संघांना वेगवेगळे मुख्य प्रशिक्षक असतील की नाही हे बोर्डाने अद्याप ठरवलेले नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीमधील खराब कामगिरीनंतर, विद्यमान सपोर्ट स्टाफमध्ये बदल होणार आहेत.
19th Feb – Champions Trophy started.
24th Feb – Pakistan eliminated.PAKISTAN HOSTING AN ICC EVENT AFTER 29 YEARS ARE KNOCKED OUT IN 5 DAYS. 🤯 pic.twitter.com/daScqVVhLB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 24, 2025
गेल्या वर्षी पीसीबीने जेसन गिलेस्पीला काढून टाकल्यानंतर जावेदला पाकिस्तानच्या रेड-बॉल संघाचा प्रभारही देण्यात आला. इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानने २-१ असा विजय मिळवला याचे श्रेयही या माजी वेगवान गोलंदाजाला देण्यात आले. तथापि, २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर त्यांचा हा छोटासा कार्यकाळ लवकरच संपण्याची अपेक्षा आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जावेद यांची अंतरिम नियुक्ती केली होती आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जवळ येताच त्यांना त्यांच्या पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. पीसीबी पुन्हा एकदा परदेशी प्रशिक्षकांचा शोध घेईल की माजी पाकिस्तानी खेळाडूला संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून पाठिंबा देईल हे पाहणे बाकी आहे.
पाकिस्तान संघाचा पुढील सामना बांग्लादेशविरुद्ध आयोजित करण्यात येणार आहे. पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये २७ फेब्रुवारी रोजी रावानंपिडी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पाकिस्तानच्या संघाने दोन्ही सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केली त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर क्रिकेट चाहत्यांकडून ट्रॉफीचा सामना करावा लागत आहे.