Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ज्युनिअर भारतीय Hockey संघात महाराष्ट्राच्या लेकीची निवड; तनू थेट इंग्लंडमध्ये उडवणार धुरळा…

शाळेत असताना हॉकी प्रशिक्षक शाहिद सय्यद यांनी तनुश्रीच्या पायांमधील वेग आणि हातांमधील स्कील ओळखले. त्यांनीच तिच्यातील कौशल्याला पहिली योग्य दिशा दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 27, 2026 | 04:37 PM
ज्युनिअर भारतीय Hockey संघात महाराष्ट्राच्या लेकीची निवड; तनू थेट इंग्लंडमध्ये उडवणार धुरळा...

ज्युनिअर भारतीय Hockey संघात महाराष्ट्राच्या लेकीची निवड; तनू थेट इंग्लंडमध्ये उडवणार धुरळा...

Follow Us
Follow Us:
  • अंडर-२१ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत तनुश्री  खेळणार 
  • भारताची ‘मिडफील्डर’ म्हणून तनुश्रीची ओळख 
  • जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवले यश 
पुणे: नशिबाचे फाटके पंख घेऊनही ध्येयाचे आभाळ कसं कवेत घ्यायचं, याचं ज्वलंत उदाहरण यवतमाळच्या लोहारा भागातील एका मुलीने जगासमोर ठेवले आहे. सरावासाठी साधा टी-शर्ट आणि ट्रॅकपँट घेतानाही ज्या कुटुंबाची दमछाक व्हायची, त्याच कुटुंबातील Yavatmal जिल्ह्यातील २० वर्षीय तनुश्री दिनेश कडू या पोरीने थेट भारतीय कनिष्ठ (ज्युनिअर) महिला हॉकी संघात स्थान मिळवले आहे. आगामी ५ ते १४ जुलै दरम्यान इंग्लंडमध्ये होणाऱ्या अंडर-२१ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत ती भारताची ‘मिडफील्डर’ म्हणून मैदानात उतरणार आहे. तनुश्रीची ही गरुडझेप केवळ एका खेळाडूचे यश नसून, ती अत्यंत हलाखीची परिस्थिती, गरिबीशी दिलेला लढा आणि स्वप्नांवर असलेल्या अढळ विश्वासाची एक थरारक यशोगाथा आहे.

FIH Nations Cup 2026: चक दे इंडिया! न्यूझीलंडला नमवत भारतीय रणरागिणींनी रचला इतिहास, FIH Nations Cup वर कोरलं नाव

तनुचा यवतमाळ येथून सुरू झालेल्या प्रवासात अनेक अडथळे आले; मात्र तिचे हॉकीबद्दल असलेले प्रेम आणि खेळाप्रती असलेली जिद्द यांच्या जोरावर तिने भारतीय अंडर-२० टीमपर्यंतचा प्रवास गाठला. यावेळी तिचे वडील दिनेश कडू यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना सांगितले की, “आम्ही मुलगा आणि मुलगी असा भेद कधीच मानला नाही. मोठी मुलगी परभणीला वैद्यकीय शिक्षण घेत आहे, तर धाकट्या तनूला खेळात मज्जाव केला नाही. तिच्या डोळ्यात हॉकीचे एक वेगळेच वेड होते. पैसा नसताना तिचे स्वप्न तुटू नये म्हणून आम्ही रक्ताचे पाणी केले, आज तिने आमच्या कष्टाचे चीज केले.” तर आईला मुलीच्या यशाबद्दल विचारले असता त्यांचे अश्रू अनावर झाले.

लोहारा ते लंडन: तनुश्रीचा थक्क करणारा प्रवास
शाळेत असताना हॉकी प्रशिक्षक शाहिद सय्यद यांनी तनुश्रीच्या पायांमधील वेग आणि हातांमधील स्कील ओळखले. त्यांनीच तिच्यातील कौशल्याला पहिली योग्य दिशा दिली. तिचे १० वी पर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथील अभयंकर कन्या शाळा येथे झाले. त्यानंतर २०२२ मध्ये तिची पुण्यातील ‘क्रीडा प्रबोधिनी’त निवड झाली. येथे तिने कॉमर्स या विषयात उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना २२-२३ या वर्षी १२ वी उत्तीर्ण केली. तसेच त्यानंतर पुढील शिक्षण एसएनडीटी (SNDT) येथे घेतले. वर्ष २०२४ मध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) तिच्यातील अफाट गुणवत्ता पाहून मुंबईच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात (NCOE) तिची निवड केली. याच टप्प्याने तिच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे खुले केले.

हा देश माझा आहे आणि कामगिरी १०० टक्के असेल!
“माझ्या यवतमाळपासून ते पुणे, मुंबई आणि बेंगळुरूपर्यंत ज्या ज्या गुरुजींनी, प्रशिक्षकांनी आणि हितचिंतकांनी मला अंगाखांद्यावर खेळवून मार्गदर्शन केले, हे यश त्या प्रत्येकाचे आहे. इंग्लंडच्या भूमीवर भारतीय जर्सी घालून देशाचा तिरंगा उंच करण्यासाठी मी माझे १०० टक्के योगदान देईन.”
— तनुश्री कडू, नवनियुक्त आंतरराष्ट्रीय हॉकीपटू, भारत.

Men’s U18 Asia Cup: सुवर्णिम कामगिरी! जपानला नमवत ‘भारत अंडर-18 आशिया कपचा’ विजेता

३ तारखेला भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना होणार
मिळालेल्या माहितीनुसार, हॉकी इंडियाने ५ ते १४ जुलै २०२६ या कालावधीत युनायटेड किंगडमच्या (UK) दौऱ्यावर जाणाऱ्या २४ सदस्यीय भारतीय कनिष्ठ महिला संघाची घोषणा केली आहे. नवीन प्रशिक्षक टिम व्हाईट यांच्या मार्गदर्शनाखाली, हा संघ ‘ज्युनिअर आशिया कप’सह आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीचा भाग म्हणून स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये सात सामने खेळणार आहे. याकरिता सध्या बेंगळुरू येथे संघाचा सराव सुरू आहे. तसेच ३ तारखेला हा संघ इंग्लंडसाठी रवाना होणार आहे.

Web Title: Yavatmal tanushree kadu playing under 21 indian hockey team international competition in england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • England
  • Hockey
  • Sports News
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Cricket: ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीग’मध्ये युवा क्रिकेटपटूंचा जलवा; पुण्याला चढला क्रिकेटचा ‘ज्वर’
1

Cricket: ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीग’मध्ये युवा क्रिकेटपटूंचा जलवा; पुण्याला चढला क्रिकेटचा ‘ज्वर’

अहमदाबादमध्ये क्रीडा क्रांती! ८२५ कोटींचे ‘वीर सावरकर Sports Complex’ सज्ज; खेळाडूंना मिळणार जागतिक दर्जा
2

अहमदाबादमध्ये क्रीडा क्रांती! ८२५ कोटींचे ‘वीर सावरकर Sports Complex’ सज्ज; खेळाडूंना मिळणार जागतिक दर्जा

Maharashtra Today’s Live News in Marathi: भाजपचा मोठा फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडा
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: भाजपचा मोठा फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडा

Boxing: ३७० खेळाडू, चुरशीच्या लढती अन् पिंपरी-चिंचवडचा विजय; आकुर्डीत ‘थाई बॉक्सिंग’चा थरार
4

Boxing: ३७० खेळाडू, चुरशीच्या लढती अन् पिंपरी-चिंचवडचा विजय; आकुर्डीत ‘थाई बॉक्सिंग’चा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.