Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yuvraj Singh on Shubman Gill: शुभमन गिलच्या इंग्लंडमधील यशावर युवराज सिंगचे कौतुक; म्हणाला- ‘टीकाकारांच्या तोंडावर चपराक!’

युवराज सिंगने टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलचे कौतुक केले आहे. युवी म्हणाला की गिलने त्याच्या फलंदाजीने टीकाकारांना योग्य उत्तर दिले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 14, 2025 | 08:16 PM
Yuvraj Singh on Shubman Gill: शुभमन गिलच्या इंग्लंडमधील यशावर युवराज सिंगचे कौतुक; म्हणाला- ‘टीकाकारांच्या तोंडावर चपराक!’
Follow Us
Close
Follow Us:

Yuvraj Singh on Shubman Gill: भारतीय संघाचा युवा कसोटी कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) याने इंग्लंड दौऱ्यात केवळ आपल्या नेतृत्वानेच नव्हे, तर फलंदाजीनेही सर्वांना प्रभावित केले. गिलच्या या कामगिरीने त्याच्यावर टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गिलच्या यशावर समाधानी असलेल्या माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) याने त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.

शुभमनची कर्णधार म्हणून अविस्मरणीय मालिका

शुभमन गिलसाठी कसोटी कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका होती. इंग्लंडसारख्या कठीण भूमीवर ५ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ७५४ धावा केल्या. या धमाकेदार कामगिरीमुळे, ‘भारताबाहेर गिल धावा करू शकत नाही’ असे म्हणणाऱ्या टीकाकारांना त्याने शांत केले आहे. भारताने इंग्लंडविरुद्धची ५ सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली, ज्याचे श्रेय गिलच्या नेतृत्वाला आणि त्याच्या युवा संघाला दिले जात आहे.

शुभमन गिल ठरला चौथ्यांदा ICC Player of the Month चा विजेता! ‘या’ दोन मातब्बर खेळाडूंना दिला धोबीपछाड

युवराज सिंगची प्रतिक्रिया

आयसीसीशी (ICC) बोलताना युवराज सिंगने शुभमन गिलची प्रशंसा केली. तो म्हणाला, “शुभमन गिलच्या परदेशातील रेकॉर्डवर अनेक प्रश्न होते. पण हा मुलगा कर्णधार झाला आणि त्याने चार शतके ठोकली. गिलची ही कामगिरी खरोखरच अद्भुत आहे. जेव्हा तुम्हाला जबाबदारी दिली जाते, तेव्हा तुम्ही ती कशी स्वीकारता हे सर्वात महत्त्वाचे असते.”

गिलच्या युवा ब्रिगेडचेही केले कौतुक

युवराजने गिलच्या युवा ब्रिगेडचेही कौतुक केले. तो म्हणाला, “मला या संघाचा खूप अभिमान आहे. जरी मालिका अनिर्णित राहिली असली तरी, माझ्या मते हा विजयच आहे. कारण हा एक तरुण संघ आहे आणि इंग्लंडमध्ये जाऊन स्वतःला सिद्ध करणे सोपे नसते.”

Yuvraj Singh lauds Team India skipper Shubman Gill after he led them to draw a memorable Test series against England.#ENGvsIND #YuvrajSingh #ShubmanGill #TeamIndia #CricketTwitter pic.twitter.com/BsOYibX8vu

— InsideSport (@InsideSportIND) August 14, 2025

इंग्लंड दौरा गाजवल्यांनंतर गिल BCCI च्या देशांतर्गत स्पर्धेतही करणार सारथ्य; Duleep Trophy 2025 मध्ये ‘या’ संघाचे नेतृत्व करणार

मालिका २-२ अशी बरोबरीत

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका (India vs England Test Series) २-२ अशी बरोबरीत संपली. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना कारावा लागला त्यानंतरएजबॅस्टनमध्ये पुनरागमन करत भारताने गिलच्या नेतृत्वाखालील संघाने शानदार कामगिरी करत इंग्लंडला हरवले. त्यानंतर, इंग्रजांनी लॉर्ड्स कसोटी जिंकली तिथे भारताला वाईट पराभवाला सामोरे जावे लागले. पण, मालिकेतील चौथी कसोटी अनिर्णित राहिली. त्यानंतर, ओव्हलमध्ये भारतीय गोलंदाजांनी, विशेषतः सिराज (Mohammed Siraj) आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) यांच्या घातक गोलंदाजीमुळे भारताने निर्णायक विजय मिळवत मालिका बरोबरीत सोडवली.

आता क्रिकेटप्रेमींचे आशिया कपकडे लक्ष

आता क्रिकेटप्रेमींना आशिया कप २०२५ स्पर्धेचे वेध लागले आहे. या स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. भारतीय संघ आणि त्यांचे क्रिकेट बोर्ड आशिया कप २०२५ च्या तयारीत मग्न आहे. आशिया कपचे वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले आहे. त्यात सहभागी होणाऱ्या संघा देखील आपल्या तयारीला लागले आहेत. लवकरत बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा होणार आहे.

Web Title: Yuvraj singh praises shubman gills success in england says a slap in the face to the critics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 08:16 PM

Topics:  

  • India vs England
  • Shubman Gill
  • Team India
  • yuvraj singh

संबंधित बातम्या

मोहम्मद सिराजच्या गाडीच्या नंबरचं नातं जर्सीशी…व्हायरल फोटोने चर्चेला सुरुवात
1

मोहम्मद सिराजच्या गाडीच्या नंबरचं नातं जर्सीशी…व्हायरल फोटोने चर्चेला सुरुवात

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास
2

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास

Asia Cup 2025 : स्पर्धेआधी होणार निवडीबाबत 4 मोठे अपडेट्स, हे खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता
3

Asia Cup 2025 : स्पर्धेआधी होणार निवडीबाबत 4 मोठे अपडेट्स, हे खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता

इरफान पठाणला मिळाला पाकिस्तानी खेळाडूचा पाठिंबा, शाहिद आफ्रिदीची केली पोलखोल; म्हणाला – तो नेहमीच कुटुंब आणि धर्मावर…
4

इरफान पठाणला मिळाला पाकिस्तानी खेळाडूचा पाठिंबा, शाहिद आफ्रिदीची केली पोलखोल; म्हणाला – तो नेहमीच कुटुंब आणि धर्मावर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.