Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ZIM : भारताविरुद्ध झिम्बाब्वेची टीम तयार! T20 मालिकेसाठी संघ जाहीर, 3 खेळाडूंना डच्चू; अनुभवी खेळाडूची एन्ट्री

Zimbabwe Announced Squad Against IND: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात ३ सामन्यांची टी- २० मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधी झिम्बाब्बे क्रिकेटने आपल्या संघाची घोषणा केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 22, 2026 | 04:48 PM
IND vs ZIM : भारताविरुद्ध झिम्बाब्वेची टीम तयार! T20 मालिकेसाठी संघ जाहीर, 3 खेळाडूंना डच्चू; अनुभवी खेळाडूची एन्ट्री
Follow Us
Follow Us:
  • झिम्बाब्वेने जाहीर केला संघ
  • 12 महिन्यांनी झाली अनुभवी खेळाडूची एन्ट्री
  • सिकंदर रझाच्या हातात संघाची धुरा
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. सिकंदर रझाच्या नेतृत्वाखालील या १५ सदस्यीय संघात अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, दोन्ही संघांमधील पहिला सामना गुरुवारी खेळला जाणार असून, संघ एक दिवस आधीच जाहीर करण्यात आला. यष्टीरक्षक-फलंदाज तफद्झवा त्सिगाचा १५ सदस्यीय संघात पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू वेस्ली माधेवेरे आणि वेगवान गोलंदाज न्यूमन न्यामहुरी यांचेही झिम्बाब्वेच्या टी२० संघात पुनरागमन झाले आहे.मालिकेतील पहिला सामना गुरुवारी हरारे येथे खेळला जाईल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली सलग सहा सामने गमावल्यामुळे यजमान संघ आपल्या शेवटच्या दोन टी-२० मालिका गमावण्यास तयार आहे.

Commonwealth Games 2026 साठी टीम इंडिया सज्ज! भारतीय खेळाडूंचे सामने कधी अन् कुठे रंगणार? संपूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

३ खेळाडूंना डच्चू, तर तफद्झवा त्सिगाची एन्ट्री

१० कसोटी सामने खेळलेल्या त्सिगाने अद्याप व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. बांगलादेश मालिकेदरम्यान कसोटी आणि एकदिवसीय संघात स्थान मिळालेला माधेवेरे, जुलै २०२५ नंतर प्रथमच टी-२० संघात परतला आहे. त्याने आतापर्यंत झिम्बाब्वेसाठी एकूण ७९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान, न्यामहुरी दुखापतीतून सावरल्यानंतर संघात परतत आहे. दुखापतीमुळे तो बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संघाचा भाग नव्हता. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत न्यामहुरीची जागा घेतलेल्या तनाका चिवांगाने संघात आपले स्थान टिकवून ठेवले आहे. हे तीन खेळाडू क्लाइव्ह मदेंदे, टिनोटेंडा माफोसा आणि ताशिंगा मुसेकिवा यांची जागा घेतील.

सिकंदर रझाच्या हातात संघाची धुरा

संघाची सूत्रे सिकंदर रझा यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. रझा यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशविरुद्ध झिम्बाब्वेची कामगिरी उत्कृष्ट होती. संघाने दमदार कामगिरी करत एकमेव कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकली. मात्र, टी-२० मालिकेत झिम्बाब्वेला १-२ असा पराभव पत्करावा लागला. यजमान संघाला रतासमोर एक कठीण आव्हान असेल. मात्र, भारतीय संघाला अलीकडेच आयर्लंड आणि इंग्लंडकडून मोठा पराभव पत्करावा लागला आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील शेवटचा सामना २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ टप्प्यात झाला होता, ज्यात भारताने झिम्बाब्वेला ७२ धावांनी पराभूत केले होते. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आतापर्यंत १४ टी-२० सामने झाले असून, त्यापैकी भारताने ११ वेळा, तर झिम्बाब्वेने ३ वेळा विजय मिळवला आहे.

मालिकेचे वेळापत्रक

टी-२० मालिकेचा पहिला सामना २३ जुलै रोजी होणार आहे. दुसरा सामना २५ जुलै रोजी आणि अंतिम सामना २६ जुलै रोजी खेळला जाईल. मालिकेतील सर्व सामने हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवले जातील.

झिम्बाब्वे टी२० संघ:

सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारवा, न्यूमन न्यामुरी, मिल्टन शुम्बा, तफादझ्वा त्सिगा

भारतीय टी२० संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव, प्रभसिमरन सिंग, रवि बिश्नोई.

David Warner अडचणीत! ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणात दोषी; जेलची टांगती तलवार

Web Title: Zim vs ind t20 zimbabwe squad announcement sikandar raza wesley madhevere comeback

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • india vs zimbabwe
  • Zimbabwe cricket team

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.