लांबपल्याच्या प्रवासासाठी कायमच विमानाने प्रवास केला जातो. यामुळे प्रवास अतिशय सुखकर आणि आरामदायी होतो. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकाची विमानात एकदा तरी बसण्याची कायमच इच्छा असते. आकाशात उडणारी विमान पाहिल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. आकाशात उडणाऱ्या विमानांचा वेग कायमच खूप जास्त असतो. पण सर्वच विमानांचा रंग एकसारखा असतो. आज आम्ही तुम्हाला विमानाचा रंग पांढराच का असतो? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)
विमानाचा रंग कायम पांढरा का असतो? कारण वाचून तुम्हाला सुद्धा बसेल आश्चर्यकारक धक्का

आकाशात उंच उडणारे विमान कधीच लाल किंवा पूर्णपणे काळ्या रंगाचे नसते. विमान कायमच पांढऱ्या रंगाचे असते. जवळपास सर्वच विमानांचा रंग पांढऱ्या रंगाचा असतो.

प्रवाशांची सुरक्षा, विज्ञान, विमाननिर्मितीतील खर्च लक्षात घेऊन विमानाचा रंग कायमच पांढरा ठेवला जातो. काही विमानांचे रंग लाल किंवा काळे असतात. सर्वच विमान हजारो फूट उंचीवरून जातात. ज्यामुळे सूर्याची किरणं थेट विमानावर पडतात.

सूर्याची किरण विमानावर पडल्यानंतर विमानाच्या वरचा भाग खूप जास्त गरम होतो. पांढरा रंग हा सूर्याची किरणे परावर्तित करतो. त्यामुळे सर्वच विमानांना कायमच पांढरा रंग दिला जातो.

पांढऱ्या रंगामुळे विमान गरम होत नाही. विमानाचे तापमान संतुलित राहते. विमानाला दिल्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगाला केमिकल आणि पिगमेंट कमी असतो. यामुळे विमानाचे वजन वाढत नाही. विमानाला गडद रंग दिल्यास ७ ते ८ प्रवाशांएवढा रंग वाढतो.

वजन कमी होण्यासाठी विमानाला कायमच पांढरा रंग दिला जातो. काही विमानावरील नाव लाल किंवा काळ्या रंगाची असतात.






