Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दारुण पराभवानंतर झिम्बाब्वे कर्णधाराचा भारताला थेट इशारा, जाणून घ्या काय म्हणाला…

Sikandar Raza: झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने भारतीय संघाला इशारा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघ दबावात असतानाच, रझाने आपल्या संघाच्या आत्मविश्वासाचे प्रदर्शन केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 23, 2026 | 05:53 PM
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दारुण पराभवानंतर झिम्बाब्वे कर्णधाराचा भारताला थेट इशारा (photo Credit- X)

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दारुण पराभवानंतर झिम्बाब्वे कर्णधाराचा भारताला थेट इशारा (photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • “आम्ही इतिहास नाही, तर मैदान …”
  • दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दारुण पराभवानंतर झिम्बाब्वे कर्णधाराचा भारताला इशारा
  • जाणून घ्या काय म्हणाला…
Sikandar Raza On Team India: टी-२० विश्वचषकमधील सुपर ८ (T20 World Cup Super-8) मध्ये भारताला पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून मानहानीकारक पराभव पत्कारावा लागला. आता झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा (Sikandar Raza) याने भारतीय संघाला इशारा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघ दबावात असतानाच, रझाने आपल्या संघाच्या आत्मविश्वासाचे प्रदर्शन केले आहे. “भारतीय मैदानांवरील अनुभवाची उणीव ही आमच्यासाठी कोणतीही अडचण नाही, आम्ही सुपर-८ मध्ये चमत्कार घडवण्यासाठी सज्ज आहोत,” असे रोखठोक विधान रझाने केले आहे.

परिस्थितीचे कोणतेही भांडवल करणार नाही

झिम्बाब्वेने गेल्या दशकभरात भारतात एकही टी-२० सामना खेळलेला नाही. मात्र, या ऐतिहासिक तथ्याकडे दुर्लक्ष करत रझाने स्पष्ट केले की, तो स्थानिक परिस्थितीचे कोणतेही बहाणे सांगणार नाही. ग्रुप स्टेजमध्ये श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांना धूळ चारल्यानंतर आता झिम्बाब्वेचा संघ सुपर-८ मध्ये दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारत यांच्याशी दोन हात करणार आहे.

IND VS SA T20 World Cup: अक्षर पटेलला संघात स्थान का नाही? कोच म्हणाले, “संघाने पॉवरप्लेमध्ये…”

रझा म्हणाला, “निकालाची आम्हाला चिंता नाही. आम्ही येथे परिस्थितीशी जुळवून घेऊ शकलो नाही, असे रडगाणे आम्ही कधीच गाणार नाही. झिम्बाब्वेचे चाहते आणि आमचा संघ असा विचार करत नाही. आम्ही केवळ आमच्या तयारीवर आणि मानसिकतेवर लक्ष केंद्रित करत आहोत.”

IPL अनुभवाचा झिम्बाब्वेला फायदा?

स्वतः आयपीएलमध्ये खेळलेला सिकंदर रझा संघासाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्याने वानखेडे स्टेडियमवरील वॉर्म-अप आणि नेट सेशन्सचा उल्लेख करत सांगितले की, संघातील काही खेळाडूंनी भारतात खेळले आहे तर काहींनी नाही, पण त्याचा खेळावर परिणाम होणार नाही. “मैदान लहान असो किंवा मोठे, दोन्ही संघांसाठी परिस्थिती सारखीच असते. मला वैयक्तिकरित्या आयपीएलमध्ये खेळल्याचा मोठा फायदा झाला आहे. आमचा संपूर्ण भर सर्वोत्तम कामगिरी करून विजय मिळवण्यावर आहे,” असे त्याने आत्मविश्वासाने नमूद केले.

सेमीफायनलचे स्वप्न आणि जिद्द

झिम्बाब्वे संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचेल का? या प्रश्नावर रझाने अत्यंत मार्मिक उत्तर दिले. तो म्हणाला, “किती लोकांनी झिम्बाब्वेला सेमीफायनलसाठी निवडले आहे? कदाचित कोणीच नाही! हीच गोष्ट आम्हाला अधिक प्रेरित करते. आम्ही तिथपर्यंत पोहोचू की नाही हे माहित नाही, पण कर्णधार म्हणून मी खात्री देतो की आम्ही आमची संपूर्ण ताकद पणाला लावू.” रझाने शेवटी सांगितले की, ग्रुप स्टेजमधील विजयानंतर संघातील आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. प्रत्येक विजयामुळे संघात सकारात्मक बदल होत असून, हीच ऊर्जा सुपर-८ मध्ये भारतासारख्या मोठ्या संघाविरुद्ध कामी येईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

Mahika Sharma Troll: पांड्या बाद झाला अन् माहिका शर्माने वाजवल्या टाळ्या! Video व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तुफान केले ट्रोल

Web Title: Zimbabwe captain issues direct warning to india after crushing defeat against south africa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • cricket news
  • Sikandar Raza
  • T20 World Cup 2026
  • Team India

संबंधित बातम्या

Sonal Dinusha: गरिबी, संघर्ष आणि बहिणीचा मोठा त्याग, कोण आहे सोनल दिनुशा; भारतीय टीमला रडवलं
1

Sonal Dinusha: गरिबी, संघर्ष आणि बहिणीचा मोठा त्याग, कोण आहे सोनल दिनुशा; भारतीय टीमला रडवलं

IND vs AFG: जगात काहीच नव्हतं का? पाकिस्तानी कंपनीला दिले Media Rights, भारत-अफगाणिस्तान T20 सिरीजचा वाद होणार
2

IND vs AFG: जगात काहीच नव्हतं का? पाकिस्तानी कंपनीला दिले Media Rights, भारत-अफगाणिस्तान T20 सिरीजचा वाद होणार

पुण्यात क्रिकेटचा थरार! Sportsfield Monsoon League मध्ये स्पर्शच्या गोलंदाजीची जादू; किरण ॲकॅडमीने…
3

पुण्यात क्रिकेटचा थरार! Sportsfield Monsoon League मध्ये स्पर्शच्या गोलंदाजीची जादू; किरण ॲकॅडमीने…

Duleep Trophy: वैभव सूर्यवंशीची जबरदस्त बॉलिंग, एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत दाखवली कमाल
4

Duleep Trophy: वैभव सूर्यवंशीची जबरदस्त बॉलिंग, एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत दाखवली कमाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.