उत्तराखंडमध्ये २०० फूट दरीत कार कोसळली, अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू

उत्तराखंड मधील नैनितालमध्ये भीषण अपघात घडला आहे. या अपघातात बस २०० फूट दरीत कोसळली. बेतालघाट विकासखंड येथे असलेल्या उंचाकोट भागात हा रस्ता अपघात घडला आहे.

    उत्तराखंड मधील नैनितालमध्ये भीषण अपघात घडला आहे. या अपघातात बस २०० फूट दरीत कोसळली. बेतालघाट विकासखंड येथे असलेल्या उंचाकोट भागात हा रस्ता अपघात घडला आहे. यामध्ये आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. तालघाट ब्लॉकच्या उंचाकोटमधील मल्लागावामध्ये रात्री उशिरा नेपाळी लोक गाडी घेऊन जात होते. या गाडीमध्ये १० प्रवासी होते. यातील आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

    एक बलेरो गाडीतून १०प्रवासी टनकपूर येथे जात होते. त्यावेळी गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी २०० मीटर खोल दरीमध्ये कोसळली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच प्रशासनाची टीम देखील बोलावण्यात आली. अपघात घडला त्यावेळी रात्र असल्याने रेस्क्यू करण्यास पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या. मात्र पोलिसांनी या अडचणींचा सामना करत अपघातामध्ये मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या नागरिकांना बाहेर काढले. बस २०० मीटर दरीत कोसळल्याने या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका व्यक्तीचा मृत्यू हा रुग्णालयात उपचार घेत असताना झाला.

    बेतालघाटचे ठाणेदार अनिष अहमद यांनी सांगितले, उंचाकोटच्या मल्लगाव येथे रात्री उशिराच्या सुमारास १० प्रवाशांना घेऊन गाडी टनकपूरकडे जात होती. तेव्हा राजेंद्र कुमार हा आपल्या गाडीमधून १० प्रवाशांना सोबत घेऊन जात होता. त्यावेळी गाडी चालवत असताना बोलेरोवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस २०० फूट खोल दरीमध्ये जाऊन पडली. त्यानंतर लगेच पोलिसांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आले.

    या भीषण अपघातामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात उपचारादरम्यान झाला. अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या सर्व नागरिक हे नेपाळचे रहिवासी आहेत. हे सर्व नागरिक जलजीवन मिशन अंतर्गत उंचाकोट येथे आले होते. तसेच हे सर्व नागरिक काल काम पुरं करून घरी परत जात असताना त्यांच्या बसला दुर्दैवाने अपघात झाला. या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या सुमारास दरीमध्ये गाडी कोसल्याचा आवाज आजूबाजूच्या नागरिकांनी ऐकल्यानंतर लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी बचावकार्य सुरु केल्यानंतर तिथे पोलीस दाखल झाले.