अभ्यासापासून खेळण्यापर्यंत AI बदलणार जग, प्रत्येक कामात होणार हस्तक्षेप
इंडिया मोबाइल काँग्रेसच्या 8 व्या आवृत्तीला मंगळवारी सुरुवात झाली आहे. 18 ऑक्टोबर पर्यंत हा इव्हेंट सुरू राहणार आहे. जवळपास सर्वच आघाडीच्या कंपन्या मोबाईल काँग्रेस इव्हेंटमध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी संबंधित आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) डिव्हाईस लाँच करत आहेत. रिलायन्स जिओने ॲडॉप्टिव्ह लर्निंग सोल्यूशनसाठी AI आणले आहे. AI सोल्यूशन्सच्या मदतीने, अभ्यासक्रम किंवा इतर कोणतेही पुस्तक वाचताना, त्यातील कठीण शब्द आणि इतर गोष्टी चांगल्या प्रकारे समजण्यासाठी मदत होणार आहे.
हेदेखील वाचा- Upcoming Smartphones in 2024: Redmi पासून Realme पर्यंत या कंपन्या लाँच करणार बजेट फ्रेंडली स्मार्टफोन
अभ्यास करताना किंवा कोणतेही पुस्तक वाचताना तुम्हाला काही अडलं किंवा एखादा शब्द कठीण वाटला तर यामध्ये AI तुमची मदत करणार आहे. तुम्हाला जो शब्द किंवा जो प्रश्न कठीण वाटतो त्या पानाचा फोटो घ्यावा लागेल आणि तो Imbibe ॲपवर टाकावा लागेल ज्यामध्ये AI सोल्यूशन आहे. अॅपमध्ये फोटो अॅड करताच, त्या पानावर दिलले सर्व कठीण शब्द खाली दिसू लागतील. या शब्दावर क्लिक करून, AI च्या मदतीने त्याबद्दलची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. (फोटो सौजन्य – pinterest)
या ॲपमध्ये NCERT पासून इतर उपयुक्त पुस्तकांपर्यंत सर्व पुस्तकांशी संबंधित 53,000 व्हिडिओ आहेत. म्हणजेच या प्रकारच्या ॲपद्वारे भविष्यात ट्यूशन घेण्याची गरज भासणार नाही. Ericson ने असा AI आधारित चष्मा विकसित केला आहे जो व्हिडीओ कॉल दरम्यान दोन्ही व्यक्तींनी म्हणजे स्पीकर आणि ऐकणाऱ्याने घातला तर त्यांना असे वाटेल की ती व्यक्ती मोबाईल फोनवर नाही तर समोर बोलत आहे.
गावात बसलेली एखादी व्यक्ती शहरातील शिक्षकाकडून काही शिकत असेल किंवा हा चष्मा घालून डॉक्टरांशी बोलत असेल, तर त्याला समोर शिक्षक किंवा डॉक्टर बसल्यासारखे वाटेल. त्याला ऑगमेंटेशन ऑफ रिॲलिटी असे नाव देण्यात आले आहे. जर एखाद्या वयस्कर किंवा अशिक्षित व्यक्तीने हे चष्मे घालून एखाद्या विशिष्ट ठिकाणी जायचे आहे किंवा बस स्टँडवर जाऊन सांगितले की, विशिष्ट ठिकाणी बस पकडायची आहे, तर हे चष्मे त्याला रस्ता देखील दाखवतील आणि ती बस आल्यावर त्याला सूचना दिली जाईल.
हेदेखील वाचा- Vivo X200 सीरीजमध्ये लाँच होणार हे स्मार्टफोन्स, सोनी कॅमेरा आणि पावरफुल बॅटरीने सुसज्ज
त्याचप्रमाणे, चष्म्याच्या आणखी एका जोडीच्या मदतीने, स्टेडियममध्ये सामन्यादरम्यान तुम्हाला मागची सीट मिळाली तरी तुम्ही मैदानावरच सामना पाहण्याचा आनंद घेऊ शकता. जिओ आता ‘हर घर टीवी बनेगा कॉम्प्युटर’ नावाची सेवा लाँच करत आहे. यामध्ये Jio Cinema, Jio TV प्रमाणेच TV मध्ये एक फीचर देण्यात आले आहे आणि त्यावर क्लिक केल्यावर टिव्ही एक कॉम्प्युटर बनेल जो क्लाउडशी कनेक्ट होईल. कीवर्ड आणि माउसच्या मदतीने तुम्ही टीव्हीचा संगणक म्हणून वापर करू शकाल. हे फीचर लवकरच सर्वांसाठी लाँच केले जाईल.
एरिक्सनने AI ने सुसज्ज रॉकी नावाचा रोबोटिक कुत्रा देखील लाँच केले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की सध्या हा कुत्रा कारखाने, खाणी आणि बंदरांमध्ये काम करेल जेथे आग, पूर किंवा इतर कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास इशारा देईल. नंतर ते घरांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून देखील वापरले जाऊ शकते.