ब्रेस्ट कँन्सर विकसित होण्याच्या 5 वर्षांआधीच AI देणार माहिती (फोटो सौजन्य - pinterest)
जगभरात AI क्षेत्रात मोठी प्रगती केली जात आहे. वैद्यकीय क्षेत्रात देखील आता AI चा वापर वाढला आहे. एखाद्या अवघड शस्त्र्तक्रियेवेळी AI चा वापर केला जातो. आतापर्यंत AI च्या मदतीने लोकांच्या आजारावर उपाय शोधले जात होते. मात्र आता AI भविष्यात होणाऱ्या आजारांची देखील माहिती देणार आहे. आता ब्रेस्ट कॅन्सर विकसित होण्याच्या 5 वर्षांपूर्वीच AI त्याची माहिती देणार आहे. ज्या महिलांना आजाराची भिती वाटत असते, त्यांच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. कारण विकसित होण्यापूर्वीच कॅन्सरची माहिती मिळाली, तर त्यावर उपाययोजना केल्या जाऊ शकतात. याबाबत डॉ.मनन व्होरा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर माहिती दिली आहे. डॉ.मनन व्होरा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
हेदेखील वाचा –ChatGPT वर आलं नवीन अपडेट, आता युजर्स विनामुल्य तयार करू शकतील AI इमेज
व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, डॉ.मनन व्होरा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका व्हिडीओद्वारे सांगितले की, आता AI मॉडेलच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सर विकसित होण्याच्या 5 वर्षाआधीच शोधला जाऊ शकतो. सध्या, ब्रेस्ट कॅन्सर शोधण्यासाठी मॅमोग्राफी हा एकमेव मार्ग आहे. मॅमोग्राफी ही सर्वात प्रभावी पद्धत आहे, परंतु त्यात 20 टक्के वेळ चुकतो, ज्यामुळे लास्ट स्टेजला कॅन्सरची माहिती मिळते. अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी AI सोल्यूशन तयार केलं आहे ज्याला ‘मिराई’ असं नाव देण्यात आलं आहे. हे एक कॉम्पलेक्स न्यूरल नेटवर्क आहे, जे CHATGPT प्रमाणे आहे. या AI सोल्यूशनच्या मदतीने ब्रेस्ट कॅन्सर विकसित होण्याच्या 5 वर्षाआधीच शोधला जाऊ शकतो, असं अहवालात सांगण्यात आलं आहे.
डॉ.मनन व्होरा यांनी पुढे सांगितलं की, ही एक रोमांचक बातमी आहे कारण ब्रेस्ट कॅन्सर हा भारतातील सर्वात सामान्य कॅन्सर आहे. भारतात ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण 28.2 टक्के आहे. ‘मिराई’ व्यतिरिक्त, इतर AI मॉडेल्सनी अलीकडेच रेडिओलॉजिस्टला मागे टाकत 20 टक्क्यांहून अधिक कॅन्सरचा शोध लावला आहे. आपण स्क्रीनिंग आणि उपचारांच्या विकासाच्या उंबरठ्यावर आहोत. गेल्या 3 दशकांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 43 टक्के घट झाली आहे. भविष्यात अशी प्रकरणे आणखी कमी होतील.
हेदेखील वाचा –पुढील 5 वर्षांत AI देणार कॅन्सरबाबत माहिती! उद्योगपती आनंद महिंद्रांचा मोठा दावा
मॅमोग्राम टेक्नॉलॉजी मानवी तंत्रज्ञ किंवा डॉक्टरांद्वारे वापरले जातं. हे मिराई इमेज इनकोडरला एनालाइड करते ज्यामुळे AI ते वाचू शकेल. हे AI दोन्ही स्तनांमधील फरक पाहते आणि इतर अनेक पारंपारिक घटकांचे विश्लेषण करते. या माहितीद्वारे पुढील 5 वर्षांपर्यंत रुग्णामध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका शोधला जातो.
दरम्यान, भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील काही दिवसांपूर्वी या AI बाबत एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं की, हे संशोधन अचूक असल्याचे सिद्ध झाले तर ते आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. AI फोटो बनवण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त उपयुक्त ठरेल. या पोस्टसोबतच त्यांनी संशोधनाची एक जुनी पोस्ट देखील शेअर केली होती.