तरूणाईच्या मनावर राज्य करणारा ShreeMan Legendआहे तरी कोण? सोशल मिडीयावरील फॉलोवर्स ऐकूण बसेल धक्का
तुम्ही इंस्टाग्राम किंवा सोशल मिडीया वापरत असाल तर तुम्ही श्रीमान लेजेंड हे नाव नक्कीच ऐकलं असेल. सध्याच्या तरूणाईच्या मनावर राज्य करणार हे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतं आहे. त्याचे इंस्टाग्राम आणि युट्युबर लाखो फॉलोवर्स आहेत. थोडक्यात सांगायचं तर सध्याच्या तरूणाईमध्ये श्रीमानची प्रचंड क्रेझ आहे. आजच्या काळात सोशल मीडियावरील स्टार्ससुध्दा बॉलीवूडच्या तारकांपेक्षा कमी नाहीत. याचे उत्तम उदारहण म्हणजे श्रीमान लेजेंड आणि फॅन्स. सोशल मीडिया स्टार श्रीमान लेजेंड म्हणजेच सिद्धांत प्रवीण जोशी. श्रीमान गेमर आणि कंटेट क्रिएटर आहे, पण यासोबतच त्याचे व्हिडीओ आजच्या तरूणाईसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.
हेदेखील वाचा- Dolly Chaiwala ची कमाई वाचून बसेल धक्का! एका ईव्हेंटसाठी घेतो तब्बल इतके पैसे
एखाद्या लहान भावाला किंवा बहिणीला आपण ज्याप्रकारे समजावतो त्याप्रमाणे श्रीमान त्याच्या फॅन्सना समजावतो. खरं तरं सगळ्या फॉलोवर्ससाठी श्रीमान मोठ्या भावासारखा आहे, असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही. श्रीमान आणि त्याची फॅन फॉलोविंग कमाल आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन तुम्ही श्रीमानबद्दल विचारल तर तिथे देखील तुम्हाला त्याची फॅन फॉलोविंग पाहायला मिळेल. पण तरूणांच्या मनांवर राज्य करणारा हा श्रीमान नक्की आहे तरी कोण? कंटेंट क्रिएटर आणि गेमर ‘श्रीमान लेजेंड’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिद्धांतचे व्हिडिओ अनेकदा ट्रेंड करत असतात. (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम)
आजच्या काळात सोशल मीडियावरील स्टारडम कोणत्याही बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही. अनेक कंटेट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएंसर्सचे इंस्टाग्रामवर शाहरुख खान आणि सलमान खानपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. पूर्वी जिथे बॉलीवूड आणि टीव्हीच्या दुनियेत नाव-प्रसिद्धीसाठी लोक झगडत असत, आता ते सोशल मीडियावर आपली प्रतिभा दाखवून लाखो-करोडो रुपये कमवत आहेत, त्याशिवाय जगभरात त्यांची ओळखही होत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सोशल मीडिया स्टार सिद्धांत प्रवीण जोशी उर्फ मिस्टर लेजेंडची ओळख करून देणार आहोत, जो त्याच्या चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
हेदेखील वाचा- AI धोकादायक आहे? ChatGPT च्या माजी कर्मचाऱ्याने केला धक्कादायक खुलासा
मिस्टर लेजेंड म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिद्धांतला लहानपणापासूनच खेळ खेळण्याची आवड होती. आज तो भारतातील पहिला PUBG मोबाइल स्ट्रीमर बनला आहे. फार कमी वेळात, सिद्धांतने YouTube आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली ओळख निर्माण केली आहे. ज्यासाठी इतर YouTubers ला अनेक वर्षे लागली, तिथे श्रीमानने त्याच्या मजेदार कंटेट आणि खास शैलीमुळे अगदी कमी वेळात लोकांची मन जिंकली. #बांधिलकी हा श्रीमानचा टॅग त्याच्या सर्व फॅन्समध्ये लोकप्रिय आहे. मैत्रीपूर्ण आणि बंधुत्वाच्या वातावरणामुळे सिद्धांतचा कंटेट युजर्सना प्रचंड आवडतो. या संपूर्ण प्रवासात सिद्धांतला त्याची आई आणि अनेक मित्रांची साथ मिळाली.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यूट्यूबवर सिद्धांतचे एकच नाही तर अनेक चॅनल आहेत. श्रीमान लेजेंड लाइव्ह या चॅनलवर त्याचे 2.12 मिलीयन सबस्क्राईबर्स आहेत. श्रीमान लेजेंड या चॅनलवर 613000 सबस्क्राईबर्स आहेत. याशिवाय इंस्टाग्रामवर सिद्धांतचे 885000 फॉलोअर्स आहेत. श्रीमानने Asus, LG Ultragear, KFC, Lenovo, TVS Apache, JBL, Realme यांसारख्या अनेक ब्रँडसोबत काम केले आहे. सिद्धांत जितका मोठा स्टार आहे तितकेच त्याचे हृदयही मोठे आहे. गरजू लोकांच्या मदतीसाठी त्याने ‘श्रीमान लेजेंड फाऊंडेशन’ नावाची संस्थाही सुरु केली आहे.
‘नानी का घर’ फाऊंडेशनच्या माध्यमातून कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान पूरग्रस्त भागांसाठी निधी उभारण्यापासून ते अनाथांना मदत करण्यापर्यंत, त्याने असंख्य जीवनांना मदत केली. श्रीमानचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. श्रीमानचे फॅन्स त्याच्यावर प्रचंड प्रेम करतात. अनेकदा सोशल मिडीया स्टार्सना एखाद्या खास प्रसंगाच्या उद्घटानासाठी बोलावले जाते. अशा प्रसंगांना श्रीमान येणार असल्याचे समजताच लाखोंच्या संख्येने त्याचे फॅन्स कार्यक्रमाला उपस्थित राहतात. श्रीमानची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.