फोटो सौजन्य -iStock
गेल्या अनेक दिवसापासून ऑनलाइन फ्रॉड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऑनलाइन पद्धतीचा वापर करून फसवणूक होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेले आहे. फोनमध्ये असलेल्या अॅप्सच्या माध्यमातून देखील अँड्रॉइड यूजर्सची फसवणूक केली जाते. आपण आपल्या फोनमध्ये अनेक अॅप्स इन्स्टॉल करतो. कधी आपल्या कामासाठी एखादा महत्त्वाचा अॅप तर कधी गेम खेळण्यासाठी एखादा गेमिंग अॅप आपण आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करतो. पण यापैकी काही अॅप्स आपल्या फोनसाठी धोकादायक असतात, हे तुम्हाला माहित आहे का?
काही अॅप्समुळे तुमच्या फोनमधील डेटा लिक होऊ शकतो. तर काही अॅप्समुळे तुमच्या फोनमध्ये व्हायरस जाण्याची भिती असते. अशाच एका धोकादायक अॅप्सबाबत सरकारच्या सायबर क्राइम विभागाने अँड्रॉइड युजर्सना इशारा दिला आहे. सरकारच्या सायबर क्राइम विभागाने एका लोन अॅपबाबत इशारा दिला आहे. Cash Expand-U Finance Assistant असं या लोन अॅपचा नाव आहे. हा अॅप तुमच्या फोनमध्ये असल्यास तो अनइन्स्टॉल करा. कारण ह्या अॅपमुळे तुमच्या फोनमधील डेटा लिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ॲपबाबत सरकारच्या सायबर क्राइम विभागाने त्यांच्या एक्स अकाऊंटवरून माहिती दिली आहे.
सरकारच्या सायबर क्राइम विभागाने एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, सावधान! The Cash Expand-U Finance Assistant – Loan app अतिशय धोकादायक अॅप असून या ॲपचे धोकादायक विदेशी कंपन्यांशी कनेक्शन आहे. या ॲपच्या युजर्सनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. #LoanApps #Cybercrime #DigitalSafety #Lending #I4C #MHA #Cyberdost #Cybersecurity #CyberSafeIndia
CashExpand-U Finance नावाचे हे ॲप 1 लाखाहून अधिक युजर्सनी डाऊनलोड केले होते. पण आता हे अॅप Google Play Store वरून काढून हटविण्यात आलं आहे. हे अॅप युजर्सना कशा प्रकारे धोकादायक आहे, याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. सरकारच्या सायबर क्राइम विभागाने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये RBI, Google Play आणि वित्त मंत्रालयाला देखील टॅग केले आहे. जर तुम्ही अँड्रॉईड युजर्स असाल आणि हे ॲप वापरत असाल तर हे ॲप त्वरित अनइन्स्टॉल करा.