Best Selfie Camera Smartphones 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
हा फोन सध्या कॅमेऱ्याच्या बाबतीत सगळ्यात वर आहे. व्हिवोने यात काहीच कमी ठेवलेली नाही. सेल्फीसाठी यात 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. एवढ्या मोठ्या कॅमेऱ्याने तुम्ही थेट 4K व्हिडिओ पण शूट करू शकता. तुमचा सेल्फी एकदम क्लिअर आणि भारी येणार.आणि मागचा कॅमेरा तर अजूनच भारी आहे. मागे 200 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आहे, त्यासोबत 200 मेगापिक्सेलचाच झूम वाला कॅमेरा आहे. त्याने तुम्ही 105 पट झूम करू शकता. लांबची गोष्ट पण जवळ दिसेल. आणि 50 मेगापिक्सेलचा वाईड कॅमेरा पण आहे. याने तुम्ही 8K व्हिडिओ काढू शकता. ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट फोन आहे. Best Selfie Camera Smartphones 2026:
गुगलच्या फोनचे फोटो नेहमीच वेगळे असतात. त्याचे फोटो एकदम नैसर्गिक येतात, कोणताही फिल्टर लावल्यासारखे वाटत नाही. यात सेल्फीसाठी 42 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. त्याचा अपर्चर f/2.2 आहे
त्यामुळे कमी लाईटमध्ये पण सेल्फी चांगला येतो.मागच्या बाजूला 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आहे ज्याला OIS आहे म्हणजे हात हलला तरी फोटो हलणार नाही. त्यासोबत 48 मेगापिक्सेलचा वाईड आणि 48 मेगापिक्सेलचाच टेलिफोटो कॅमेरा आहे. याचा झूम पण 120x पर्यंत जातो. ज्यांना एडिटिंग न करता नैसर्गिक फोटो हवे असतील त्यांनी पिक्सेल घ्यावा.
Realmee Mobile : Realmee चा नवा फोन बाजारात उपल्बध ! फिचर काय असाणार, नव्या मोबाईलची किंमत किती …
सॅमसंगचा हा अल्ट्रा फोन नेहमीच चर्चेत असतो. यात पण कॅमेऱ्याची कमी नाही. यात मागे चार कॅमेरे दिले आहेत. 200 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा, 50 मेगापिक्सेलचा 5x झूम वाला कॅमेरा, 50 मेगापिक्सेलचा वाईड कॅमेरा आणि 10 मेगापिक्सेलचा 3x झूम वाला कॅमेरा. म्हणजे फोटोसाठी सगळे ऑप्शन यात आहेत. यात 8K व्हिडिओ आणि HDR10+ पण आहे.सेल्फीसाठी यात 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. मेगापिक्सेल जरी कमी वाटत असले तरी सॅमसंगचा कॅमेरा सॉफ्टवेअर खूप चांगला आहे त्यामुळे सेल्फी पण एकदम भारी येतो.
जर तुमचं बजेट कमी असेल पण तुम्हाला चांगला सेल्फी कॅमेरा हवा असेल तर हा फोन तुमच्यासाठी आहे. कमी पैशात प्रीमियम फील देणारा हा फोन आहे.यात पण पुढे 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. मागे 200 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा वाईड कॅमेरा आहे. यात Aura Light आहे त्यामुळे रात्री पण फोटो चांगले येतात. तसेच AI Magic Weather, AI Magic Landscape, AI Four-Season Portrait आणि 30x Super Zoom सारखे भारी फीचर्स पण यात दिले आहेत.तर हे चार फोन सध्या सेल्फीसाठी बेस्ट आहेत. तुम्हाला जर फक्त सेल्फी हवा असेल आणि बजेट जास्त असेल तर Vivo X300 Ultra किंवा Pixel घ्या. आणि बजेट कमी असेल तर Vivo V70 FE एकदम योग्य आहे.






