प्रत्येक चिपमध्ये भारतीय डिझाइनची छाप आहे, पण अद्याप कोणतीही भारतीय चिप नाही - भाविश अग्रवाल (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
ओलाचे संस्थापक भावीश अग्रवाल तंत्रज्ञान क्षेत्रात नेहनीच सक्रीय असतात. आता त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. प्रत्येक चिपवर भारताच्या डिझाइनचा ठसा आहे, पण भारताची स्वतःची चिप नाही, असं भाविश अग्रवाल यांनी म्हटलं आहे. अग्रवाल यांनी भारतातील पहिली चिप तयार करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की, भारताच्या पहिल्या एआय चिपची घोषणा ही एक मूनशॉट आहे आणि कंपनीला आपले वचन पूर्ण करण्याचा विश्वास आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत भावीश अग्रवाल यांनी हे वक्तव्य केलं आहे.
हेदेखील वाचा-रिकामी भांडी जास्त आवाज करतात… MapMyIndia च्या आरोपांवर भावेश अग्रवाल यांचं उत्तर
मुलाखतीवेळी अग्रवाल यांनी या धाडसी आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पामागील त्यांची दृष्टी आणि चिप तयार करणे हा जोखमीचा प्रयत्न का आहे याबद्दल विस्तृतपणे सांगितल आहे. अग्रवाल krutrim च्या रोडमॅपचे नेतृत्व करत आहेत. जेणेकरून त्याच्या AI क्षमतांना बळकट केलं जाऊ शकेल. अग्रवाल म्हणाले की, कंपनी आपल्या AI चिपसाठी फॅब सेट करणार नाही. त्याऐवजी, कंपनीने तैवान, कोरिया किंवा अगदी यूएस इकोसिस्टममधील जागतिक फाउंड्रीसह काम करण्याची योजना आखली आहे. चर्चा सुरू आहे, परंतु अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आशा आहे की कोणीतरी भारतात अत्याधुनिक फॅब तयार करेल आणि आम्हाला त्याचा वापर करण्यात आनंद होईल.
त्यांनी पुढे सांगितलं की, जगातील प्रत्येक चिप भारतातून जाते, भौतिकदृष्ट्या नव्हे, तर डिझाइनच्या दृष्टीने. भारतात प्रत्येक चिपची काही रचना (घटक) असते, परंतु आमच्याकडे कोणतीही भारतीय चिप नाही. आमच्याकडे जगातील सर्वाधिक सिलिकॉन चिप डिझायनर आहेत, परंतु भारतीय चिप्स नाहीत. म्हणून, आम्ही आमची स्वतःची चिप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. krutrim – हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ ‘कृत्रिम’ आहे. CPU आणि AI चिप्स, प्लॅटफॉर्म आणि सिस्टम्सच्या विकासासाठी आर्म आणि अनटेदर AI सारख्या जागतिक प्रमुख कंपन्यांसोबत धोरणात्मक भागीदारीची मालिका जाहीर केली आहे. कंपनीने AI साठी ‘बोधी’, जनरल कंप्यूटसाठी ‘सर्व्ह’ आणि एजसाठी ‘ओजस’ नावाच्या चिप्सच्या पहिल्या कुटुंबाची घोषणा केली.
हेदेखील वाचा- भारताने जागतिक तंत्रज्ञानातील बदलाचे नेतृत्व केले पाहिजे! भाविश अग्रवाल यांचं विधान
अग्रवाल यांनी पुढे सांगितलं की, कंपनी 2026 पर्यंत भारतातील पहिली AI सिलिकॉन चिप डिझाईन आणि उत्पादन करेल जी जटिल AI वर्कलोडसाठी सानुकूल आहे. त्यानुसार, चिप जलद आणि अधिक कार्यक्षम AI प्रणाली विकसित करण्यास सक्षम करेल. krutrim 2028 पर्यंत Bodhi 2 लाँच करेल. AI हे भविष्यातील एक अतिशय महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे आणि आपण भारतातील या प्रवासाचे नेतृत्व करणे आवश्यक आहे. जर तुम्ही सध्याची परिस्थिती पाहिली तर मला वाटते की आम्ही अजूनही इतर कोणाच्या तरी तंत्रज्ञानाचा आदर्श घेत आहोत, विशेषतः डिजिटल जगात. आम्ही आमच्या स्वतःच्या चिप्सचा वापर आमच्या स्वतःच्या वर्कलोडमध्ये करू.
चीप बनवणे हा ‘मूनशॉट’ आहे, हे मान्य करण्यात अग्रवाल यांना अजिबात संकोच नव्हता. हा शब्द त्यांनी अलीकडेच तामिळनाडूतील कृष्णगिरी येथील फ्युचरफॅक्टरी येथे ओलाच्या वार्षिक लाँच इव्हेंट संकल्प 2024 मध्ये वापरला होता. हा एक मूनशॉट आहे, परंतु आम्ही त्यासाठी जाण्यास तयार आहोत. हा एक धोकादायक प्रयत्न आहे, परंतु आम्हाला खात्री आहे की आम्ही ते करू शकतो.