उत्तर कोरियात आता महिलाराज? हुकूमशहा किम जोंग उन यांनी जाहीर केला आपला उत्तराधिकारी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, किम जू एई किम जोंग उनच्या निधनानंतर उत्तर कोरियाचा कारभार स्वीकारणार आहे. सध्या किम जू एई हिच्याबद्दल माहिती सार्वजिनकरित्या फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ती फार कमी वेळा सार्वजिनक कार्यक्रमांमध्ये दिसून आली आहे. काही विशेष कार्यक्रमांमध्ये वडिल किम जोंग उन यांच्यासोबत ती दिसली असून तिच्या पुढील उत्तर अधिकारी होण्याचा दावा केला जात आहे. दक्षिण कोरियाची गुप्तचर संस्थेच्या मते, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किम जू एईची वाढती उपस्थिती तिचा पुढील अधिकारी बनण्याचे संकेत देत आहे.
दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, किम जोंग उन यांना तीन मुले आहेत. यामध्ये दोन मुले आणि एक मुलगी किम जू एई. परंतु त्यांच्या मुलांबाबत अद्याप कोणतीही माहिती सार्वजिनक करण्यात आलेली नाही. तज्ज्ञांच्या मते किम जोंग उन आपल्या मुलीला पुढे आणण्यामागे बरीच महत्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे किम जोंग उन देशातील पितृसत्ताक ठसा मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. १९४८ पासून उत्तर कोरियामध्ये पुरुषांचे राज्य असून वारसा तसाच चालत आला आहे.
दुसरे कारण म्हणजे किम जोंग उनच्या मुलांबाबत आतापर्यंत कोणतीही माहिती सार्वजनिक झालेली नाही. याउलट किम जोंग उन सतत मुलीला पुढे आणत आहे. तर तिसरे मोठे कारण म्हणजे किम जोंग उन यांची बहिण किम यो जोंग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. किम यो जोंग गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर कोरियात चर्चेचा विषय राहिल्या आहेत. परंतु किम जोंग उनला सत्ता बहिणीच्या हाती सोपवायची नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उत्तर कोरियामध्ये वारसाहक्काचा खेळ आतापर्यंत गूढ राहिलेला आहे. परंतु गेल्या काही काळापासून किम जोंग उन आपल्या मुलीला जागतिक पातळीवरील राजकीय कार्यक्रमांमध्येही घेऊन जात आहेत. यामुळे तिच्या उत्तराधिकारी बनण्याचे संकेत अधिक वाढले आहेत. यामुळे उत्तर कोरियाच्या इतिहासाला एक नवी ओळख मिळण्याची शक्यता आहे.






