देशात इंटरनेटची वाढती क्रेझ; वर्षभरात जोडले कोट्यावधी नवीन युजर्स, Jio आणि Airtel आघाडीवर (फोटो सौजन्य- pinterest)
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने इंटरनेट युजर्सची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार देशभरात इंटरनेटचा क्रेझ दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. या अहवालानुसार इंटरनेट युजर्सची संख्या 120.5 कोटी पार झाल्याचे पाहायला मिळत आहे. ट्रायच्या अहवालानुसार, Reliance Jio आणि Bharti Airtel ने नवीन ग्राहक जोडल्यामुळे भारतीय दूरसंचार ग्राहकांची संख्या जूनमध्ये 120.5 कोटी पार झाली आहे.
हेदेखील वाचा- Jio-Airtel ची डोकेदुखी वाढली! BSNL-TATA च्या करारानंतर आता इंटरनेटची चाचणी सुरू
भारताच्या दूरसंचार क्षेत्रात गेल्या एका वर्षात प्रचंड वाढ झाली आहे. या काळात भारतीय टेलिकॉमने काही आश्चर्यकारक रेकॉर्ड केले आहेत. गेल्या एका वर्षात कोट्यवधी नवीन ग्राहक भारतीय दूरसंचार विभागाशी जोडले गेले आहेत. गेल्या एका वर्षात देशात 7.3 कोटी नवीन इंटरनेट ग्राहक आणि 7.7 कोटी नवीन ब्रॉडबँड ग्राहक जोडले गेले आहेत. परवडणाऱ्या दरात डेटाची उपलब्धता, चांगले नेटवर्क कव्हरेज आणि डिजिटल सेवांची वाढती मागणी या कारणांमुळे ग्राहकांची संख्या वाढत आहे. ब्रॉडबँड ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे देशातील हायस्पीड इंटरनेटची पोहोच वाढत आहे, ज्यामुळे ई-कॉमर्स, ऑनलाइन शिक्षण, दूरसंचार आणि इतर डिजिटल सेवांच्या वाढीला चालना मिळत आहे.
इंटरनेट ग्राहकांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे भारत जगातील सर्वात मोठ्या इंटरनेट बाजारपेठांपैकी एक बनला आहे. दूरसंचार क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी भारत सरकारने अनेक धोरणात्मक पाऊले उचलली आहेत. TRAI च्या जूनमधील सबस्क्राइबर रिपोर्टमध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, वायरलेस ग्राहकांची संख्या वाढून 117 कोटींहून अधिक झाली आहे. मे महिन्यात ही संख्या 3.47 वाढून 116.89 कोटी झाली होती. त्यानंतर जूनमध्ये ही संख्या 3.51 कोटींनी वाढून 117 कोटींहून अधिक झाली आहे. Reliance Jio आणि Bharti Airtel ने दोन्ही क्षेत्रातील वाढीचे नेतृत्व केले.
हेदेखील वाचा- हरवलेली वस्तू शोधण्यासाठी वापरा JioTag Air! काय आहे किंमत जाणून घ्या
भारतातील टेलिफोन ग्राहकांची एकूण संख्या मे 2024 अखेरमध्ये 1,203.69 मिलियन होती. तर ही संख्या जून 2024 अखेरपर्यंत 1,205.64 मिलियन इतकी वाढली आहे. Reliance Jio ने महिनाभरात 19.11 लाख नवीन वायरलेस ग्राहक जोडले, तर Bharti Airtel ने या महिन्यात 12.52 लाख नवीन ग्राहक जोडले. Vodafone Idea (VIL), BSNL, MTNL आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या ग्राहकांच्या तोट्यामुळे एकूण वायरलेस सेगमेंटमध्ये निव्वळ वाढ 15.73 लाखांवर घसरली.
VI ने या महिन्यात 8.6 लाख ग्राहक गमावले, BSNL ने 7.25 लाख गमावले, MTNL ने 3,927 गमावले, तर RCom ने 2 वायरलेस सदस्य गमावले. वायरलाइन सेगमेंटमध्ये, Reliance Jio ने 4.34 लाख नवीन ग्राहक जोडून या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. यानंतर एअरटेलने 44,611 नवीन ग्राहक जोडले, VI ने 21,042 आणि VMIPL ने 13,996 नवीन ग्राहक जोडले. BSNL ने जूनमध्ये सर्वाधिक वायरलेस ग्राहक गमावले. कंपनीने 60,644 ग्राहक गमावले. क्वाड्रंटने 37,159 ग्राहक गमावले, तर Tata Teleservices ने 32,315, MTNL ने 6,218 आणि APSFL ने 829 ग्राहक गमावले.