ChatGPT Go सबस्क्रिप्शन आता एक वर्षासाठी 'फ्री' (Photo Credit - X)
नवी दिल्ली: भारतीय युजर्ससाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! ओपनएआय (OpenAI) कंपनी भारतात त्यांचे ChatGPT Go सबस्क्रिप्शन प्लान एका वर्षासाठी मोफत (Free) करणार आहे. भारतीय युजर्ससाठी ही ऑफर ४ नोव्हेंबर २०२५ पासून ॲक्टिव्ह होईल. सध्या हे सबस्क्रिप्शन भारतात युजर्ससाठी ₹३९९ प्रति महिना दरात उपलब्ध आहे. म्हणजेच, या सेवेसाठी युजर्सला वर्षाला ₹४,७८८ द्यावे लागत होते. आता हा प्लान फ्री झाल्यामुळे युजर्सची वार्षिक ₹४,७८८ इतकी बचत होणार आहे. ओपनएआयने म्हटले आहे की, भारत ही त्यांची दुसरी सर्वात मोठी आणि सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे.
ChatGPT चे फ्री व्हर्जन वापरणाऱ्यांना मेसेज लिमिट कमी असते, इमेज जनरेट करण्याची संख्या मर्यादित असते आणि ‘मेमरी’ (मागील संभाषण आठवण ठेवण्याची क्षमता) कमी असते. परंतु ‘गो’ (Go) व्हर्जनमध्ये खालील फायदे मिळतात:
सध्याचे सबस्क्राइबर्स: जे युजर्स आधीपासून ₹३९९ प्रति महिना रक्कम भरत होते, त्यांच्यासाठी देखील ही ऑफर लागू असेल. त्यांना भरलेली रक्कम रिफंड किंवा क्रेडिट म्हणून परत मिळू शकते.
ChatGPT Go लॉन्च झाल्यानंतर भारतात पेड सबस्क्रिप्शन दुपटीने वाढले आहे. युजर्सना जास्त एंगेज करण्यासाठी आणि मेट्रो शहरांच्या बाहेरही AI पोहोचवण्यासाठी ही फ्री ऑफर आहे. कंपनीचा हा निर्णय ‘इंडिया-फर्स्ट’ दृष्टिकोन आणि इंडिया AI मिशनशी जुळणारा आहे. कंपनीने गुगल (Google) आणि पर्प्लेक्सिटी (Perplexity) च्या फ्री प्लानला उत्तर देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. (उदा. गुगलने विद्यार्थ्यांसाठी वार्षिक ₹१९,५०० ची प्रो मेंबरशिप एका वर्षासाठी फ्री केली होती, तर पर्प्लेक्सिटीने एअरटेलसोबत प्रीमियम प्लान मोफत देण्यास सुरुवात केली आहे.)
आता WhatsApp आणि Messenger स्वत: देणार स्कॅम अलर्ट! कसं काम करणार नवीन फीचर, जाणून घ्या सविस्तर






