फोटो सौजन्य - Social Media
भारतीय संस्कृतीत सोन्याला केवळ दागिन्यांचा नव्हे तर समृद्धी, स्थैर्य आणि शुभतेचा प्रतीक मानले जाते. विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे हे शुभ मानले जाते. पारंपरिक पद्धतीने सोन्याची खरेदी करण्यापेक्षा आता डिजिटल पद्धतीने गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील अग्रगण्य फिनटेक कंपनी पेटीएम आपल्या वापरकर्त्यांसाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि स्मार्ट डिजिटल गोल्ड खरेदीचे पर्याय उपलब्ध करून देत आहे.
पेटीएमच्या डिजिटल गोल्ड सेवेद्वारे वापरकर्ते फक्त ₹५१ पासून २४ कॅरेट शुद्ध सोने खरेदी करू शकतात. खरेदी केलेले हे सोने भागीदार बँकांच्या सुरक्षित तिजोरीत ठेवले जाते आणि त्याची रिअल-टाइम किंमत वापरकर्ते पेटीएम अॅपवर पाहू शकतात. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी पेटीएमने डेली, वीकली आणि मंथली एसआयपी (SIP) पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे नियमित बचत करताना बाजारातील चढ-उताराचा धोका कमी होतो आणि हळूहळू अधिक सोन्याची गुंतवणूक करता येते.
पेटीएमच्या प्रत्येक व्यवहाराची नोंद डिजिटल लॉकरमध्ये केली जाते. वापरकर्ते आपले सोने कधीही विकू शकतात किंवा रिडीम करू शकतात. लवकरच, बीआयएस प्रमाणित हॉलमार्क गोल्डची डिलिव्हरी सेवा सुरू होणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या घरपोच शुद्ध सोन्याची खात्री मिळेल. अलीकडेच पेटीएमने आणखी एक आकर्षक योजना पेटीएम गोल्ड कॉईन्स सुरू केली आहे. या योजनेद्वारे ग्राहकांना त्यांच्या प्रत्येक व्यवहारावर गोल्ड कॉईन रिवॉर्ड्स मिळतात. म्हणजेच स्कॅन अँड पे, ऑनलाइन शॉपिंग, मोबाईल रिचार्ज, बिल पेमेंट किंवा मनी ट्रान्सफर यांसारख्या व्यवहारांवर वापरकर्त्यांना गोल्ड कॉईन्स मिळतात. १०० गोल्ड कॉईन्स म्हणजे ₹१ चे डिजिटल गोल्ड. एकदा १५०० कॉईन्स जमा झाल्यावर ते सहजपणे डिजिटल गोल्डमध्ये रूपांतरित करता येतात.
या योजनांमुळे ग्राहकांना दैनंदिन व्यवहारांमधूनच हळूहळू सोने साठवण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे, पेटीएमच्या डेली गोल्ड एसआयपी योजनेत फक्त ₹५१ पासून गुंतवणूक सुरू करता येते. हे योजनाबद्ध गुंतवणुकीचे एक सुरक्षित आणि सोयीचे साधन आहे. या धनत्रयोदशीला पारंपरिक सोन्याची खरेदी करण्याऐवजी डिजिटल गोल्डच्या माध्यमातून गुंतवणूक करून आपण केवळ शुभत्व नव्हे, तर आर्थिक स्थैर्याचाही पाया रचू शकतो. पेटीएमच्या या नव्या सेवांमुळे “स्मार्ट सेव्हिंग्स आणि सुरक्षित इन्व्हेस्टमेंट”चा मंत्र घराघरात पोहोचत आहे. या सणात पेटीएम डिजिटल गोल्ड एसआयपीद्वारे समृद्धी आणि बचतीचे प्रतीक कायम ठेवा. कारण प्रत्येक छोट्या गुंतवणुकीत मोठ्या भविष्याची बीजं दडलेली असतात.