एअरटेल आणि जिओचे वार्षिक प्लॅन्स (फोटो- istockphoto)
एअरटेल अन् जिओने आणले जबरदस्त वार्षिक प्लॅन्स
वार्षिक प्लॅन्समध्ये मिळतील अनेक फायदे
दोन्ही कंपन्या देतात अनेक फायदे
आजच्या काळात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आपली बरीचशी कामे ही मोबाइलच्या माध्यमातूनच पूर्ण होत असतात. त्यासाठी आपल्या इंटरनेटची आवश्यकता असते. इंटरनेट वापरण्यासाठी आपल्याला रीचार्ज करण्याची गरज असते. सध्या भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्या आहेत, ज्यांचे अनेक रीचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. आज आपण एअरटेल आणि जिओ कंपनीच्या वार्षिक रीचार्ज प्लॅन्सबद्दल जाणून घेऊयात.
अनेक जण महिन्याच्या महिन्याला रीचार्ज करत असतात. मात्र ते दर महिन्याला रीचार्ज करायचे लक्षात ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे आज आपण वार्षिक रीचार्ज प्लॅन्सबद्दल जाणून घेऊयात. ज्यामुळे तुमचा एकसारखा रीचार्ज करण्याचा वेळ वाचणार आहे. एअरटेल आणि जिओने अनेक वार्षिक प्लॅन्स आणले आहेत. ज्यामध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळणार आहेत. वार्षिक रीचार्ज प्लॅन्समध्ये अनेक प्रकारच्या सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो.
जिओचा 3599 रूपयांचा प्लॅन
जिओचा 3599 रूपयांचा प्लॅन हा 365 दिवसांसाठी येतो. यामध्ये तुम्हाला दररोज 2.5 जीबी हाय स्पीड डेटा अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस दररोज असे अनेक फायदे मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला जिओ टीव्ही आणि जिओ हॉटस्टारचे मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे. याशिवाय जिओहोमचे 2 महिन्यांचे फ्री ट्रायल मिळते.
एअरटेलचा 3599 रूपयांचा प्लॅन
एअरटेलचा 3599 रूपयांचा प्लॅन हा 365 दिवसांसाठी येतो. यामध्ये तुम्हाला 2 जीबी डेटा दररोज, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एसएमएस मोफत असे फायदे मिळतात. यामध्ये तुम्हाला Perplexity Pro AI मोफत मिळणार आहे.
Flipkart Big Bang Diwali Sale: Realme P4 Pro 5G वर जबरदस्त सवलत! लॉन्चपेक्षा 4 हजारांनी स्वस्त
जिओचा 3999 रूपयांचा प्लॅन
जिओचा 3999 रूपयांचा प्लॅन हा 365 दिवसांसाठी येतो. यामध्ये तुम्हाला दररोज 2.5 जीबी हाय स्पीड डेटा अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस दररोज असे अनेक फायदे मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला जिओ टीव्ही आणि जिओ हॉटस्टारचे मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
एअरटेलचा 3999 रूपयांचा प्लॅन
एअरटेलचा 3599 रूपयांचा प्लॅन हा 365 दिवसांसाठी येतो. यामध्ये तुम्हाला 2 जीबी डेटा दररोज, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एसएमएस मोफत असे फायदे मिळतात. यामध्ये तुम्हाला डीजनी हॉटस्टारचे मोफत सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. जर तुम्हाला हे प्लॅन्सचे रीचार्ज करायचे असतील तर तुम्ही MyJio App, Jio.com, Airtel Thanks App, airtel.in किंवा जवळील कंपनीच्या स्टोअरमध्ये जाऊन रीचार्ज करू शकता.