दिवाळी निम्मित इ-कॉमर्स वेबसाईटवर एकशे पेक्षा एक ऑफर सुरु आहे. मोबाइल, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आदी. अश्या अनेक वस्तूंवर ऑफर सुरु आहे. दिवाळी म्हंटल तर फोटो स्टोरेजचा प्रॉब्लेम येतो. आता फोटो आणि डेटा साठवण सोपं होणार आहे. गुगल ने दिवाळी निम्मित आपल्या युजर्ससाठी एक जबरदस्त ऑफर आणला आहे. हा ऑफर केवळ काही काळ पर्यंत ठराविक आहे. ज्यात Google One स्टोरेज प्लॅन खूप स्वस्त किमतीत उपलब्ध आहे.
सारखा रिचार्ज करून कंटाळलाय? एकदाच करून टाका Jio अन् Airtel चे वार्षिक प्लॅन्स; मिळतील ‘हे’ फायदे
दरवर्षी सणासुदीचा काळ येतो तेव्हा, गुगल आपल्या लाखो वापरकर्त्यांसाठी खास ऑफर घेऊन येते. यावेळीही कंपनीने एक खास ऑफर जाहीर केली आहे. जी तुम्हाला या दिवाळीत स्टोरेजची काळजी करण्याची गरज नाही याची खात्री करेल. कंपनी केवळ ११ रुपयांमध्ये गुगल ड्राइव्हमध्ये अतिरिक्त स्टोरेज देत आहे.
किती दिवसांसाठी हा ऑफर
खरं तर, दिवाळीच्या काळात, जेव्हा प्रत्येकजण खूप फोटो काढत असतो, तेव्हा स्वस्त आणि अतिरिक्त स्टोरेज हे एक वरदान आहे. हेच लक्षात घेत गुगलने हा ऑफर आणला आहे. गुगलची ऑफर मर्यादित आहे आणि सर्व प्लॅन पहिल्या तीन महिन्यांसाठी फक्त ₹११ मध्ये उपलब्ध आहेत.
Google One स्टोरेज मासिक प्लॅनच्या किमती
Lite 30GB प्लान: पहिल्या तीन महिन्यांसाठी ₹११, त्यानंतर ₹५९/महिना
Basic 100GB प्लान: पहिल्या तीन महिन्यांसाठी ₹११, त्यानंतर ₹१३०/महिना
Standard 200GB प्लान: पहिल्या तीन महिन्यांसाठी ₹११, त्यानंतर ₹२१०/महिना
Premium 2TB प्लान: पहिल्या तीन महिन्यांसाठी ₹११, त्यानंतर ₹६५०/महिना
का ही ऑफर खूप फायदेशीर ठरू शकते?
दिवाळीसाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत, आपण सणासुदीच्या निम्मिताने खूप फोटो काढतो की कधी कधी डेटा वाचवण्यासाठी आमच्याकडे जागा संपते. दरम्यान, ही स्वस्त गुगल ड्राइव्ह स्टोरेज ऑफर खूप फायदेशीर ठरू शकते.
Realme P4 Pro 5G वर जबरदस्त सवलत! लॉन्चपेक्षा 4 हजारांनी स्वस्त
Flipkart च्या Big Bang Diwali सुरु झाला आहे. या सेलमध्ये Realme P4 Pro 5G स्मार्टफोनवर मोठी सवलत मिळत आहे. अलीकडेच लॉन्च झालेला हा फोन आता फेस्टिव्हल सेलमध्ये कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.
सारखा रिचार्ज करून कंटाळलाय? एकदाच करून टाका Jio अन् Airtel चे वार्षिक प्लॅन्स; मिळतील ‘हे’ फायदे