शॉपिंगसाठी तयार राहा!सुरु होतोय Flipkart Big Billion Days Sale, बंपर ऑफर्ससह करा खरेदी (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
शॉपिंग करण्याची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट त्यांच्या ग्राहकांसाठी लवकरच एक सेल घेऊन येत आहे. जिथे तुम्हाला बंपर ऑफर्स आणि धमाकेदार डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. येत्या काही दिवसांतच म्हणजे 30 सप्टेंबर रोजी प्लिपकार्टचा हा सेल सुरु होणार आहे. कपडे, अॅक्सेसरिज, टिव्ही, फ्रिज, मोबाईल, यासह अनेक वस्तूंच्या खरेदीवर तुम्हाला आकर्षक मिळणार आहेत. फ्लिपकार्टच्या वेबसाइटवरून ही माहिती मिळाली आहे.
हेदेखील वाचा- YouTube वर सबस्क्रायबर्सची कमाल! कोणत्या क्रिएटर्सना मिळतं सिल्व्हर, गोल्डन आणि डायमंड प्ले बटण?
Flipkart Big Billion Days सेल 30 सप्टेंबरपासून सुरु होणार असला तरी देखील प्रिमियम ग्राहकांसाठी हा सेल 29 सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोनपासून लॅपटॉप आणि इतर उपकरणांपर्यंत सर्व गोष्टींवर उत्तम ऑफर मिळू शकतात. गेल्या वर्षी फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल ऑक्टोबरमध्ये सुरू झाला होता. मात्र यंदा हा सेल 2 दिवस आधीच सुरु होत आहे. या सेलमध्ये तुम्हाला लॅपटॉप, टीव्ही, स्मार्टवॉच तसेच अनेक प्रीमियम स्मार्टफोन्सवर भरघोस डिस्काऊंट मिळणार आहे. Flipkart Big Billion Days सेलमध्ये तुम्ही Apple, Samsung आणि OnePlus सारखे फोन स्वस्त दरात खरेदी करू शकता.
शिवाय, फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये लोकांना फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्के सूट दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय गिफ्ट कार्डद्वारे लोकांना 1,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. त्यामुळे तुमचा फोन खराब झाला असेल आणि तुम्ही नवीन फोन घेण्याचा किंवा तुमचा फोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर Flipkart Big Billion Days तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते.
हेदेखील वाचा- Xiaomi युजर्ससाठी आनंदाची बातमी! फोनची बॅटरी खराब झाली आहे का? मग कंपनीच्या या ऑफरमध्ये बदलून घ्या
Flipkart Big Billion Days सेल बाबत टिपस्टर मुकुल शर्माने त्याच्या X अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. मुकुल शर्माने फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 30 सप्टेंबर 2024 पासून प्रत्येकासाठी सुरू होणार आहे. फ्लिपकार्टवर देखील याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना शॉपिंग करण्यासाठी आणखी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना Flipkart Big Billion Days सेलमधून मनसोक्त शॉपिंग करण्याची संधी मिळणार आहे.
Flipkart Big Billion Days सेलमध्ये ग्राहकांना एक्सचेंज आणि ईएमआय ऑफर, कॉम्बो डील मिळू शकते. फ्लिपकार्ट पे लेटरद्वारे 100,000 रुपयांपर्यंतचे क्रेडिट, फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे 5 टक्के कॅशबॅक आणि प्लस सदस्यांसाठी सुपरकॉइन वापरण्यावर 5 टक्के सूट दिली जाऊ शकते. टेक डील्ससाठी, ग्राहक स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, ऑडिओ आणि इतर ॲक्सेसरीजवर मोठ्या सवलतीच्या ऑफरची अपेक्षा करू शकतात. मोबाइल फोनसाठी, ग्राहक Apple, Samsung, Google आणि इतरांकडून फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर सवलतीची अपेक्षा करू शकतात.