नालासोपारा पूर्वेतील प्रगती नगर भागात एक मोठी घटना घडली आहे. येथील 40 फ्लॅट असलेली ‘सबा अपार्टमेंट’ ही इमारत अचानक एका बाजूला कलंडल्याने मोठी धावपळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले आहे.सितारा बेकरी जवळील परिसरात ही घटना घडली. इमारत धोकादायक स्थितीत आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून, आजूबाजूची इमारत देखील तातडीने रिकामी करण्यात आली आहे.