मधुमेह हा एक गंभीर आजार आहे, ज्यात रक्तीतील साखर झपाट्याने वाढू लागते. मधुमेह रुग्णांना आपल्या रक्तीतील साखर नियंत्रित करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. यासाठी अनेक औषधांचेही सेवन केले जाते पण आज आम्ही तुम्हाला एका अशा औषधी उपायाविषयी सांगत आहोत ज्याचे सेवन करुन तुम्ही तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात करु शकता. रामदेव बाबांच्या मते, जांभळाच्या बिया मधुमेहाच्या रुग्णांसाठी एका औषधाप्रमाणे काम करतात. हे शरीरात इन्सुलिन तयार करण्यास मदत करते.
रक्तातील साखर कमी करण्यासाठी रामदेव बाबाने सांगितला घरगुती जुगाड; या फळापासून तयार करा देसी चूर्ण
रक्तातील साखर नियंत्रणात करण्यासाठी मधुमेह रुग्णांनी दररोज आपल्या आहारात जांभळाचा समावेश करावा. जर जांभळाचा सीजन नसेल तर तुम्ही त्याच्या बियांचा चूर्ण तयार करुन त्याचे सेवन करु शकता.
जांभळाच्या बियांचा चूर्ण तयार करण्यासाठी जांभळाच्या बिया सर्वप्रथम धुवून, सुकवून घ्या. यानंतर त्यांची एक पावडर तयार करा
जांभळाच्या बियांच्या पावडरमध्ये काही सुक्या कारल्याचे तुकडे, काळे जिरे, चिरईता आणि कुटकी यांना सुकवून पेस्ट करुन मिक्स करा.
ही बारीक पावडर मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक औषध म्हणून काम करेल. सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मिसळून या पावडरचे सेवन करावे.
रामदेव बाबांच्या मते, ही जांभळाची पावडर स्वादुपिंड मजबूद करण्यास मदत करते आणि यामुळे रक्तातील साखर देखील कमी होण्यास सुरुवात होते. याचे नियमित सेवन शरीरीत इन्सुलिन तयार करण्यास मदत करते.