भारतासह इतर 6 देशांमध्ये लाँच होतोय Google AI Overview (फोटो सौजन्य - pinterest)
Google चे AI-पावर्ड सर्च फीचर म्हणजेच Google AI Overview लवकरच भारतात देखील उपलब्ध होणार आहे. Google AI Overview फीचर भारतासह एकूण 6 देशांमध्ये लाँच करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या देशांमध्ये भारत, युनायटेड किंगडम, जपान, इंडोनेशिया, मेक्सिको आणि ब्राझील यांचा समावेश आहे. या सर्व देशांमध्ये आता लवकरच Google AI Overview फीचर उपलब्ध असेल. सर्वात आधी हे फीचर अमेरिकेत लाँच करण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी या फीचरमध्ये अनेक त्रुटी आढळल्या, तसेच काही गंभीर समस्यांचा सामना देखील करावा लागला. या सर्व गोष्टी लक्षात घेत कंपनीने Google AI Overview मध्ये अनेक बदल केले आणि त्याची चाचणी घेतली. त्यानंतर आता Google AI Overview भारतासह इतर 6 देशांमध्ये लाँच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेदेखील वाचा- Google, Microsoft आणि Adobe सह या टेक कंपन्यांमध्ये आहेत भारतीय सीईओ!
Google AI Overview सर्वात आधी अमेरिकेत लाँच करण्यात आलं होतं. मात्र यावेळी या फीचरमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. Google AI Overview अमेरिकेत लाँच केल्यानंतर सुरुवातीला काही समस्या निर्माण झाल्या होत्या. सुरुवातीला गंभीर चुका केल्याबद्दल आणि धोकादायक सूचना केल्याबद्दल Google AI Overview वर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. Google AI Overview ने काही युजर्सना पिझ्झावर चीज चिकटवण्यासाठी गोंद लावण्याचा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर Google AI Overview वर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर कंपनीने या फीचरमध्ये अनेक बदल केले.
Google ने त्यात खूप सुधारणा केल्या आणि Google AI Overview मधील काही उत्तरे मॅन्युअली काढून टाकली. या सगळ्यानंतर, अमेरिकेत या वैशिष्ट्याचा सकारात्मक परिणाम मिळाला. त्यामुळे आता कंपनीने या फीचरचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेदेखील वाचा- Google ने जारी केला अलर्ट! स्कॅमर आणि बनावट ईमेलपासून वाचण्यासाठी दिल्या सूचना
कंपनीचे म्हणणे आहे की, हे फीचर वापरणारे युजर्स अधिक समाधानी तर आहेतच पण ते Google सर्चचा जास्त वापर करत आहेत. Google AI Overview आता भारत, युनायटेड किंगडम, जपान, इंडोनेशिया, मेक्सिको आणि ब्राझीलमध्ये लाँच होत आहे. हे स्थानिक भाषांमध्ये देखील शोध परिणाम दर्शविण्यास सक्षम आहे. हे फिचर काही युजर्ससाठी आधीच उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि हळूहळू सर्व युजर्स ते वापरू शकतील.
AI Overview फीचर गूगल सर्चवर सर्च करण्यात आलेल्या क्वेरीवर आधारित AI-जनरेटेड सारांश तयार करतो. हे सारांश वेबवरील विविध स्त्रोतांकडील डेटाचे विश्लेषण करून तयार केले जातात आणि युजर्सना ते शोधत असलेल्या माहितीचे त्वरित अवलोकन प्रदान करतात. याच्या मदतीने यूजरला कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वीच महत्त्वाची माहिती मिळते. Google ने पहिल्यांदा हे AI फीचर मे मध्ये लाँच केले होते, परंतु सुरुवातीला काही चुका आणि धोकादायक सूचनांमुळे टीकेला सामोरे जावे लागले. याशिवाय काही समरीमध्ये जाहिरातींचा समावेश करण्यात आला होता. या समस्यांनंतर, Google ने हे फीचर तात्पुरते थांबवले होते. यानंतर आता AI Overview पुन्हा लाँच केले गेले आहे.