Google Map Update: पैसे वाचवण्यासाठी गुगल मॅप करणार मदत, या फीचरच्या मदतीने गाडी चालवताना होणार इंधनाची बचत
लोकप्रिय नेव्हिगेशन अॅप गुगल मॅप आतापर्यंत तुम्हाला रस्ता शोधण्यासाठी मदत करत होते. मात्र आता गुगल मॅप तुम्हाला पैसे वाचवण्यासाठी देखील मदत करणार आहे. तुम्ही गुगल मॅपच्या मदतीने इंधनाची बचत करू शकता, ज्यामुळे तुमचे पैसे वाचणार आहेत. गुगल मॅपच्या एका खास फीचरच्या मदतीने तुम्ही इंधनावर खर्च होणारा पैसा वाचवू शकता.
हेदेखील वाचा-Google Map Update: गुगल मॅप युजर्ससाठी महत्त्वाची टीप! लोकेशन हिस्ट्री, सर्च रिजल्ट अशा पद्धतीने करा डिलीट
गुगल मॅपने आपल्या युजर्ससाठी फ्यूल सेविंग फीचर सुरु केलं आहे. भारतातील गुगल मॅप युजर्स देखील या फीचरचा वापर करू शकतात. गुगल मॅपच्या या फीचरच्या मदतीने तुम्ही इंधनाची बचत करून इंधनावर खर्च होणारा पैसा वाचवू शकता. यापूर्वी हे फीचर केवळ अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधील गुगल मॅप युजर्ससाठी सुरु करण्यात आलं होतं. आता कालांतराने हे फीचर भारतात देखील लाँच करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
खरं तर, हे फीचर इनेबल करताच, गुगल मॅप फ्यूल वाचवण्याच्या विविध पद्धतींवर कार्य करण्यास सुरुवात करणार आहे. इंधनाची बचत करण्यासाठी, रिअल-टाइम ट्रॅफिक आणि रस्त्यांची स्थिती या घटकांवर आधारित मार्गाची माहिती दिली जाते. यासह, जेव्हा हे फीचर इनेबल केले जाते, तेव्हा वापरकर्त्याला त्याच्या फोनमध्ये क्विक रूटची सूचना मिळते. जर हे फीचर डिसेबल केले असेल तर गुगल मॅप युजर्सना केवळ जलद मार्गाची माहिती देते. फीचर डिसेबल केल्यानंतर गुगल मॅप इंधन बचतीच्या मार्गांवर काम करत नाहीत.
हेदेखील वाचा- Google Map Update: स्पीड चलानपासून सुरक्षित राहण्यासाठी गुगल मॅप करेल मदत, फक्त करा ही सेटिंग
इलेक्ट्रिक वेहिकल सेटिंग्स – जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन वापरत असाल तर गुगल मॅप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. कारण गुगल मॅप्समुळे चार्जिंग स्टेशन शोधणं सोपं झाले आहे. फक्त तुमचा चार्जर प्रकार निवडा आणि गुगल मॅप्स तुमच्या जवळचे चार्जिंग स्टेशन हायलाइट करेल.
स्ट्रीट व्यू टाइम ट्रॅवल फीचर – गुगल मॅपच्या स्ट्रीट व्यू टाइम ट्रॅवल फीचरसोबत एखादं ठिकाणं भुतकाळात कसं दिसायचं हे तुम्ही अगदी सहजपणे एक्सप्लोर करू शकता.
लाइव्ह लोकेशन – गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही सुरक्षितता लक्षात घेऊन तुमचे लाईव्ह लोकेशन तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करू शकता.