Google Map Update: गुगल मॅप युजर्ससाठी महत्त्वाची टीप! लोकेशन हिस्ट्री, सर्च रिजल्ट अशा पद्धतीने करा डिलीट
तुम्ही गुगल मॅप युजर असाल किंवा तुम्ही प्रवासावेळी गुगल मॅपचा वापर करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की गुगल मॅपच्या वापरामुळे अज्ञात मार्ग देखील अगदी सोपे होतात. आपण गुगल मॅपवर अनेक ठिकाणं सर्च करतो. पण तुम्हाला माहीत आहे की, गुगलला तुमच्या प्रत्येक ठिकाणाची माहिती असते. म्हणजेच तुम्ही कोणत्या तारखेला कोणत्या ठिकाणी होता, कोणतं ठिकाण सर्च केलं होतं, ही तुमची सर्व माहिती गुगल मॅपवर सेव्ह केली जाते. अशा परिस्थितीत ही माहिती गुगल मॅपवरून काढून टाकणे आवश्यक आहे.
हेदेखील वाचा- Google Map Update: अशा पद्धतीने गुगल मॅपमध्ये मिळणार वेदर अपडेट, एयर क्वालिटी इंडेक्सचीही माहिती मिळणार
गुगल मॅपवर सेव्ह करण्यात आलेली कशा प्रकारे डिलीट करायची याबद्दल अनेकांना कल्पना नसते. तर आता आम्ही तुम्हाला गुगल मॅपवर लोकेशन हिस्ट्री, सर्च रिजल्ट कशा पद्धतीने डिलीट करायचं याबद्दल सांगणार आहोत. कारण गुगल तुमची माहिती सेव्ह करत असला तरी देखील तुम्हाला प्रायव्हसी सेटिंगची सुविधा दिली जाते. ज्यामुळे तुम्ही सर्च हिस्ट्री तसेच लोकेशन हिस्ट्री गुगल मॅपवरून अगदी सहज डिलीट करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
हेदेखील वाचा- Google Map Update: iPhone वर गुगल मॅपला डिफॉल्ट नेविगेशन अॅप बनवायचं? या सोप्या टीप्स तुम्हाला करतील मदत
फ्लायओव्हरच्या माहितीअभावी लोकांना समस्यांना सामोरे जावे लागते, असे अनेकवेळा घडते. परंतु आता असं होणार नाही. कारण गुगल मॅपवरील टेक फ्लायओव्हर फीचर फ्लायओव्हर येण्यापूर्वीच तुम्हाला माहिती देणार आहे. ज्यामुळे तुम्हाला कळते की आपल्याला पुढे कोणता फ्लायओव्हर घ्यावा लागेल. याशिवाय मॅप अपडेट करताना गुगलने अनेक नवीन फीचर्स जोडले आहेत, जे वापरकर्त्यांना ड्रायव्हिंग करताना खूप मदत करतील. गुगल मॅपची ही सुविधा अतिशय उपयुक्त आहे. हे थ्रीडी ग्राफिक्समध्ये स्पष्ट व्हिज्युअल प्रदान करते आणि ड्रायव्हरला कोणता फ्लायओव्हर घ्यावा लागेल, याबद्दल माहिती देते.