जर तुम्ही गुगल पिक्सेल Google Pixel 8a घेण्याचा विचार करत असाल, तर ही सर्वोत्तम वेळ आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर Googleच्या या अद्भुत स्मार्टफोनवर एक जबरदस्त ऑफर उपलब्ध आहे. गुगलचे पिक्सेल स्मार्टफोन स्टँडर्ड अँड्रॉइड डिव्हाइसेसच्या तुलनेत अद्वितीय वैशिष्ट्यांसह येतात. सध्या, Pixel 8a स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 31 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतो.
Flipkart ची GOAT सेल लवकरच; iPhone 16 वर महा डिस्काउंट; किंमत काय?
Google Pixel 8a डिस्काउंट
Google Pixel 8a स्मार्टफोन सध्या Flipkartवर 52,999 रुपयांना लिस्ट झाला आहे. Flipkart सध्या या फोनवर 28 टक्के सूट देत आहे. या डिस्काउंटसह, फोनची किंमत 37,999 रुपयांपर्यंत कमी होते. यासोबतच, जर तुम्ही HDFC Bank कार्डने EMI पेमेंट केले तर कंपनी 7000 रुपयांची त्वरित सूट देत आहे. अशा प्रकारे, फोन 30999 रुपयांच्या प्रभावी किमतीत खरेदी करता येईल. अशा प्रकारे, या फोनवर सुमारे 22 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.
Google Pixel 8a स्मार्टफोन कंपनीने गेल्या वर्षी मे महिन्यात लाँच केला होता. हा फोन अॅल्युमिनियम फ्रेम आणि प्लास्टिक बॅक पॅनलसह येतो. या फोनमध्ये कंपनीने 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz हर्ट्झ आहे. हा डिस्प्ले पॅनल Corning Gorilla Glass 3 प्रोटेक्शनसह येतो. हा गुगल फोन Android 14 सह येतो.
Google Pixel 8a स्मार्टफोनच्या चिपसेटबद्दल बोलायचे झाले तर, त्यात Google Tensor G3 आहे. यासोबतच, यात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Google Pixel 8a स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे, ज्यामध्ये 13 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच सेल्फीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
भारतात Starlink ची एंट्री, किती असणार स्पीड,
एलोन मस्कची कंपनी स्पेसएक्सच्या सॅटेलाईट इंटरनेट प्रोजेक्ट स्टारलिंकला भारत सरकारकडून व्यावसायिक इंटरनेट सेवेसाठी मान्यता मिळाली आहे. आता लवकरच देशभरातील ग्रामीण आणि दुर्गम भागात हाय-स्पीड इंटरनेट उपलब्ध होईल, जिथे मोबाइल नेटवर्क आणि ब्रॉडबँड अद्याप उपलब्ध नाहीत.
आजही भारताच्या अनेक भागांमध्ये सॅटेलाईटच्या समस्यांमुळे इंटरनेटची सेवा उपलब्ध नाही. मात्र आता स्टारलिंकला मान्यता मिळाल्यामुळे ही सेवा कानाकोपऱ्यात पोहचण्याची शक्यता आहे. पण त्याआधी त्याचा साधारण वेग किती असेल आणि त्याची किंमत किती मोजवी लागेल याबाबत अधिक माहिती घेऊया.
स्टारलिंक म्हणजे काय?
स्टारलिंक ही एक उपग्रह-आधारित इंटरनेट सेवा आहे जी पृथ्वीच्या लो-ऑर्बिट (LEO) मध्ये फिरणाऱ्या हजारो लहान उपग्रहांद्वारे इंटरनेट सेवा प्रदान करते. पारंपारिक नेटवर्क अयशस्वी झालेल्या ठिकाणी इंटरनेट प्रदान करणे हा तिचा उद्देश आहे.सविस्तर बातमी
Lenovo चा नवीन टॅब झाला लाँच, 10,200mAh ची बॅटरी, पावरफुल प्रोसेसर……