फोटो सौजन्य - Poco and honor
तुम्ही नवीन फोन घेण्याचा किंवा तुमचा जुना फोन अपग्रेड करण्याचा विचार करत आहात का तर तुमच्यासाठी असलेली ही बातमी नक्की वाचा. Honor ने अलीकडेच Honor 200 5G लाँच केला आहे. Honor तर्फे Honor 200 सीरीज अंतर्गत हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. तर Poco ने देखील Poco F6 5G लाँच केला आहे. तुम्ही या दोन्ही फोनमध्ये गोंधळले असाल आणि या दोन्हीपैकी तुमच्यासाठी कोणता फोन बेस्ट ठरेल, हे तुम्हाला समजत नसेल, तर ही बातमी वाचा.
हेदेखील वाचा – तुमचा आवाजच तुमच्या मत्यूचं कारण बनू शकतं का? ‘या’ AI मॉडेलचा वापर धोकादायक ठरू शकतो
यामध्ये Honor 200 5G आणि Poco F6 5G या दोन्ही फोनच्या फीचर्सची तुलना करण्यात आली आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार फोनची खरेदी करू शकाल. वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेल्या Poco F6 5G ची Honor 200 5G सोबत तुलना केली जात आहे. चला तर मग पाहूया कोणत्या फोनचे फिचर्स बेस्ट आहेत आणि कोणता फोन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.
Honor ने आपल्या Honor 200 सीरीज अंतर्गत Honor 200 5G हा स्मार्टफोन लाँच केला आहे. HONOR 200 Pro 5G मध्ये 2700 × 1224 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.78-इंच 1.5K OLED डिस्प्ले, 120Hz चा रिफ्रेश रेट आणि 4000 nits पर्यंत ब्राइटनेस आहे. Honor 200 5G दोन स्टोरेज व्हेरीएंट मध्ये लाँच करण्यात आला आहे. 8GB + 256GB व्हेरिएंट ची किंमत 34,999 रुपये आहे. तर 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. हे मूनलाईट व्हाइट आणि ब्लॅक कलरमध्ये येते. Honor 200 5G मध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. तर फोनमध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा आहे आणि हार्कोट पोर्ट्रेट स्टाइल फीचर देखील देण्यात आला आहे.या स्मार्टफोनमध्ये 50-MP पोर्ट्रेट प्रायमरी कॅमेरा आणि 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे.
हेदेखील वाचा – ‘ही’ कंपनी भारतात लाँच करणार स्मार्टफोन! OnePlus आणि Xiaomi ला देणार टक्कर
Poco F6 5G तीन व्हेरीएंट मध्ये उपलब्ध आहे. 8GB+256GB व्हेरिएंट ची किंमत 29,999 रुपये आहे. तर 12GB+256GB व्हेरिएंट ची किंमत 31,999 रुपये आहे . तसेच 12GB+512GB हा व्हेरिएंट 33,999 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच हा फोन ग्रीन, टायटॅनियम आणि ब्लॅक अशा तीन रंगात उपलब्ध आहे. Poco F6 5G मध्ये 1.5K रिझोल्यूशनसह OLED डिस्प्ले आहे आणि 50-MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 90W वायर्ड फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 5,000mAh बॅटरी आहे. हा फोन 12GB पर्यंत LPPDDR5x रॅमसह octa-core 4nm Snapdragon 8s Gen 3 SoC वर चालतो.
Poco F6 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा युनिट आहे, ज्यामध्ये 50-MP 1/1.9-इंचाचा सोनी IMX882 सेन्सर आणि 8-MP Sony IMX355 अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, 20-MP OV20B फ्रंट कॅमेरा आहे. यात 512GB UFS 4.0 स्टोरेज आहे.