फोटो सौजन्य: Pinterest
डिझायर आणि अमेझ या दोन्ही कार्समध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे, मात्र त्यांच्या इंजिनच्या रचनेत महत्त्वाचा फरक आहे. डिझायरमध्ये तीन सिलेंडर इंजिन मिळते, तर अमेझमध्ये चार सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. त्यामुळे अमेझची पॉवर थोडी जास्त असून ती 90 हॉर्सपॉवर निर्माण करते. त्याउलट डिझायर 82 हॉर्सपॉवरची पॉवर देते. टॉर्कच्या बाबतीत मात्र डिझायर थोडी पुढे आहे. ती 113 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते, तर अमेझ 111 न्यूटन मीटरपर्यंत मर्यादित राहते.
भारतात 4 लाख, पाकिस्तानात 29 लाख! तरी देखील Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर पाकिस्तानी ग्राहक फिदा
रिअल-वर्ल्ड मायलेजच्या बाबतीत दोन्ही गाड्यांमध्ये फरक दिसून येतो. शहरात अमेझचे मायलेज सुमारे 9.94 किमी प्रति लिटर आहे, तर डिझायर सुमारे 11.61 किमी प्रति लिटर देते.
हायवेवर अमेझ सुमारे 16.62 किमी प्रति लिटर मायलेज देते, तर डिझायर सुमारे 19.22 किमी प्रति लिटरपर्यंत पोहोचते. सरासरी मायलेजचा विचार केला तर अमेझ सुमारे 13.28 किमी प्रति लिटर देते, तर डिझायर सुमारे 15.41 किमी प्रति लिटर देते.
अमेझच्या अधिकृत दाव्यापेक्षा प्रत्यक्ष मायलेजमध्ये सुमारे 6.18 किमी प्रति लिटरचा फरक दिसून येतो. डिझायरच्या बाबतीत हा फरक सुमारे 10.3 किमी प्रति लिटर आहे. तरीही रिअल-वर्ल्ड टेस्टमध्ये डिझायर AMT ने अमेझ CVT ला सुमारे 2.13 किमी प्रति लिटरने मागे टाकले आहे.
Maruti Suzuki ने नेहमीच मायलेज-केंद्रित कार्सवर भर दिला आहे. कंपनीने कमी इंधनात जास्त अंतर कापता येईल, अशा पद्धतीने इंजिनची रचना केली आहे. दुसरीकडे, Honda चे इंजिन तुलनेने पॉवर-ओरिएंटेड असते. त्यामुळे ड्रायव्हिंग अनुभव अधिक स्मूद आणि दमदार मिळतो, मात्र मायलेजवर थोडासा परिणाम जाणवू शकतो.






