न्यूझीलंडचे श्रीलंकेसमोर १६९ धावांचे आव्हान (Photo Credit- X)
70 runs in the last four overs! Santner and McConchie fight back after Sri Lanka’s middle-overs spin strangle to lift New Zealand beyond 160 with an 84-run partnership – New Zealand’s highest for the seventh wicket in men’s T20Is 🤝https://t.co/86Qv7yH757 | #T20WorldCup pic.twitter.com/wKHYGMIN75 — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 25, 2026
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसंघाची वाईट सुरुवात झाली. एकेकाळी किवी संघाने ८४ धावांवर ६ विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनर आणि कोल मॅककोंची यांच्यात ७ व्या विकेटसाठी ४७ चेंडूत ८४ धावांची भागीदारी झाली. या सामन्यात मिशेल सँटनरच्या बॅटने २६ चेंडूत ४७ धावांची खेळी केली, तर कोल मॅककोंचीने नाबाद ३१ धावांची महत्त्वाची खेळी केली. या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर महेश थिकष्णा आणि दुष्मंथा चामीरा यांनी ३-३ विकेट घेतल्या, याशिवाय दुनिथ वेलालेज एक विकेट घेण्यात यशस्वी झाला.
IND vs ZIM: कमी लेखण्याची चूक नको! Zimbabwe ने टीम Indiaला ‘इतक्या’ वेळा हरवलंय; पाहा आकडेवारी!
हा सुपर ८ सामना श्रीलंकेसाठी एक मोठी परीक्षा आहे, कारण यजमान संघाने त्यांचा पहिला सुपर ८ सामना इंग्लंडविरुद्ध गमावला. न्यूझीलंडनेही सुपर ८ मध्ये अद्याप विजय मिळवलेला नाही, पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर त्यांना एक गुण मिळाला आहे. त्यामुळे दोन्ही संघाना उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.
श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चारिथ असालंका, पवन रत्नायके, कामेंदू मेंडिस, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेल्लालागे, दुशन हेमंथा, दुष्मंथा चमीरा, महेश थेकशाना, दिलशान मदुशंका.
न्यूझीलंड: टिम सेफर्ट (विकेटकीपर), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर (कर्णधार), कोल मॅककॉन्ची, मॅट हेन्री, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन.






