जगभरात व्हॅट्सऍप चे लाखो ऍक्टिव्ह यूजर्स आहेत. हा एक मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे जो आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. इतर फीचर्सप्रमाणेच व्हॅट्सऍप कोणत्याही युजर्सला ब्लॉक करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. मात्र आपल्याला कोणी ब्लॉक केले आहे, हे यावर उलगडले जात नाही. अशावेळी तुम्हालाही कोणी ब्लॉक केले आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
जर तुम्हाला व्हॉट्सॲपवरील ब्लॉकबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर अशा काही गोष्टी आहेत ज्या सूचित करतात की कोणत्या युजरने तुम्हाला ब्लॉक केले आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
डीपी न दिसणे
जर तुम्हाला कोणत्या युजरची डीपी दिसत नसेल, तर याचा अर्थ त्याने तुम्हाला ब्लॉक केले आहे, असा लावला जाऊ शकतो. याशिवाय ब्लॉक केलेल्या व्यक्तीचे अचानक स्टेटसदेखील दिसणे बंद होते.
मेसेज रीड न होणे
आपण पाठवलेल्या मेसेजला ब्लू टिक आली की त्या व्यक्तीने तो मेसेज वाचला आहे, असा याचा अर्थ होतो. मात्र असे होत नसेल तर समजून जा की, त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे.
लास्ट सीन
अनेकदा चॅटबॉक्सवर गेल्यावर त्या व्यक्तीचा लास्ट सीन दिसू लागतो. मात्र तुम्हाला जर ब्लॉक केले असेल तर त्या व्यक्तीचा लास्ट सीन तुम्हाला दिसणे बंद होईल, तसेच व्यक्ती ऑनलाईन आहे की नाही याबद्दलही कोणीतीच माहिती तुम्हाला दिसणार नाही. मात्र नाकेदा काही लोक सेटिंगद्वारे ही माहिती लपवण्याचा प्रयत्न करतात .
व्हॅट्सऍप ग्रुप
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये इंन्क्लुड करण्याचा प्रयत्न करत असाल आणि ते होत नसेल तर याचा अर्थ त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले, असा होऊ शकतो.
कॉल न लागणे
एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठीचा उत्तम मार्ग म्हणजे त्या व्यक्तीला थेट व्हॅट्सऍप कॉल लावणे. जर कॉल लागत नसेल आणि सतत व्यस्थ लागत असेल तर समजून जा तुम्हाला ब्लॉक करण्यात आले आहे.