गुगल पे (Google Pay) हे एक लोकप्रिय पेमेंट ॲप आहे. मोबाईल रिचार्ज, इलेक्ट्रिसिटी बिल इत्यादीसह प्रत्येक लहान-मोठे पेमेंट गुगल पे ॲपद्वारे केले जाते. जगभरात गुगल पे’चे करोडो युजर्स आहेत. याच्या मदतीने सहज कुठेही आणि कधीही पेमेंट करता येते. आपल्या रोजच्या आयुष्यात लोक ॲपचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. गुगल पे हे गुगलच्या मालकीचे ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. अशा परिस्थितीत, सुरक्षेची काळजी करण्याची गरज नाही, परंतु अनेक प्रसंगी गुगल पे ॲपमधून अचानक पैसे कापले जातात, परंतु पेमेंट केले जात नाही. हे सहसा खराब मोबाइल नेटवर्क किंवा सर्व्हरमधील समस्येमुळे होऊ शकते.
रिफंड न आल्यावर काय करावे?
जर तुमचा गुगल पे वरील व्यवहार अयशस्वी झाला असेल आणि बँक अकाउंटमधून पैसे कापले गेले असतील, तर तुम्हाला साधारणपणे तीन ते पाच दिवसांत तुमच्या बँक खात्यात रिफंड मिळेल, परंतु जर बराच काळ निघून गेल्यावरही तुम्हाला रिफंड मिळाला नाही, तर येथे नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करा. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार ज्याच्या मदतीने तुमचा रिफंड सहज मिळवू शकता.
हेदेखील वाचा – Google Chrome युजर्ससाठी सरकारची नवीन वाॅर्निंग! ताबडतोब हे काम करा नाहीतर चोरी होतील बँक डिटेल्स
कॉलद्वारे कसे मिळवावे रिफंड?
जर 3 ते 5 दिवसांत पैसे परत केले गेले नाहीत, तर तुम्हाला सर्वप्रथम गुगल पे व्हॉईस सपोर्टला (Google Pay Voice support) कॉल करावा लागेल. यासाठी तुम्हाला 1800-419-0157 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा लागेल. गुगल हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगूसह अनेक भारतीय भाषांमध्ये समर्थन पुरवते. यानंतर व्हाईस सपोर्ट तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल. त्याच्या मदतीने कस्टमर केअरशी बोलून तुम्हाला तक्रार नोंदवता येईल.
हेदेखील वाचा – Vodafone-Airtel आमने-सामने, सरकारच्या निर्णयावर नाराज, युजर्सवर काय होणार परिणाम?
चॅटद्वारे तक्रार कशी करावी