आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर लिंक करायचा? नो टेंशन, ही आहे सोपी प्रोसेस! खर्च फक्त 50 रुपये
आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. आपल्याला प्रत्येक कामासाठी आधार कार्डची गरज असते. अगदी शाळेपासून ते ऑफीसपर्यंत प्रत्येक ठिकाणी भारतीय नागरिकत्वाचा पुरावा म्हणून आधार कार्ड मागितलं जातं. शिवाय तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुमच्याकडे आधार कार्डची प्रत मागितली जाते. ज्या ठिकाणी आपलं आधार कार्ड लॉग इन केलं जात त्यावेळी आपल्याला ओटीपीची गरज असते. ज्यामुळे आपलं आधार कार्ड सुरक्षित असतं आणि ओटीपीशिवाय ते कुठेही लॉगइन होऊ शकत नाही.
हेदेखील वाचा- Jio Recharge Plans: जिओचे दोन जबरदस्त रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरंच काही
ओटीपीसाठी आधारमध्ये मोबाइल नंबर लिंक असणे देखील खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक नसेल तर समस्या उद्भवू शकतात. असे अनेक लोक आहेत ज्यांच्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर लिंक नाही. त्यामुळे जर तुम्हाला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करायचा असेल तर ही प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी जास्त शुल्क भरण्याची देखील गरज नाही. मोबाईल नंबर आधार कार्डसोबत लिंक करण्याची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने जाणून घ्या. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)
आधारमध्ये तुमचा मोबाइल क्रमांक अपडेट करणे महत्त्वाचे आहे. जर नंबर लिंक नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर सरकारी लाभ, बँकिंग आणि मोबाईल सेवा मिळणे कठीण आहे. बऱ्याच सेवांचा लाभ घेण्यासाठी, आधी आधारशी नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP पाठवला जातो.
हेदेखील वाचा- Netflix वर तुमच्या आवडत्या सीनचा स्क्रीनशॉट घेणं झालं सोपं! चुटकीसरशी होईल काम, फॉलो करा या स्टेप्स
आधारमध्ये मोबाइल नंबर ऑनलाइन अपडेट करण्यासाठी, UIDAI वेबसाइटवर जावे लागेल आणि अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. त्यानंतर बायोमेट्रिक डिटेलसाठी नोंदणी केंद्रावर जावे लागेल. त्यासाठी काही प्रक्रिया अवलंबावी लागेल.
ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त आधार नोंदणी केंद्रावर जाऊन तुमचा बायोमेट्रिक डिटेल द्यावा लागणार आहे. जर तेच काम ऑफलाइन केले असेल तर तुम्हाला सर्व कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील आणि त्यासाठी जास्त वेळ लागतो.