Maharashtra Breaking News Updates Today:
स्थानिक निवडणुकानंतर आता विधान परिषदांच्या निवडणुकीकडे लागले लक्ष
मुंबई : लोकसभा, विधानसभा त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत. या सर्व महत्त्वाच्या निवडणुका झाल्याने राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये असलेली प्रशासकीय राजवट संपृष्टात आली आहे. त्यानंतर आता २०२३ पासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषद मतदारसंघातील निवडणूक होण्याची चिन्ह आहेत. राज्यात सध्या या मतदारसंघाच्या १७ जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेचे संख्याबळ ७८ सदस्यीय असून, स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून २२ सदस्य निवडून दिले. जिल्हा परिषदांचे लोकनियुक्त, स्वीकृत आणि पदसिद्ध सदस्य हे या मतदारसंघाचे मतदार आहेत. विधान परिषदेवर जाण्यासाठी राज्यातील ही सर्वांत ‘अर्थपूर्ण’ आणि महागडी निवडणूक समजली जाते. अनेक दिग्गज नेत्यांनी पूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, काही पक्षांनी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या धनिकांनाही याच मतदारसंघाच्या माध्यमातून आमदारकी बहाल केली होती.
10 Feb 2026 05:50 PM (IST)
मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अवजड वाहनांवर व्यापक आणि पारदर्शक तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोटार परिवहन व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट शब्दांत सूचित केले.अपघात रोखायचे असतील तर नियमांची केवळ अंमलबजावणी नव्हे, तर जागरूकतेची चळवळ उभी राहिली पाहिजे.
10 Feb 2026 05:26 PM (IST)
मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक असलेली राखी सावंत तिच्या विधानांनी नेहमीच चर्चेत असते. शिवाय, ती अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अनोखे कपडे घालते आणि तिचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. तिची विधाने सोशल मीडियावर लवकरच चर्चेचा विषय बनतात. आता, राखी सावंतने आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिने असेही म्हटले की आई होण्यासाठी लग्न आवश्यक नाही. तिने असेही म्हटले की ती सरोगेटसाठी कोणाच्याही शुक्राणूंचा वापर करू शकते. तिचा असा विश्वास आहे की ती सलमान खान वगळता कोणत्याही अभिनेत्याचे शुक्राणू वापरू शकते.
10 Feb 2026 05:14 PM (IST)
भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात रविवारी, १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) संघ आमनेसामने येतील. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील हा सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे खेळला जाईल आणि भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची घोषणा झाल्यानंतर, कोलंबोला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे भाडे लक्षणीयरीत्या वाढले आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कोलंबोला जाणाऱ्या काही विमानांचे भाडे १ लाख रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.
10 Feb 2026 05:00 PM (IST)
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम वाहन उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. मात्र, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दमदार डिस्कॉऊंट जाहीर करणे सुद्धा महत्वाचे असते. प्रत्येक कार खरेदीदार त्यांची ड्रीम कार खरेदी करताना डिस्काउंटच्या शोधात असतो. जर तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात, ज्यावर तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळेल. तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
10 Feb 2026 04:50 PM (IST)
Narayan Rane Health Update News Marathi: भाजप खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयाशी संबंधित समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. काही काळापूर्वी, कोकण दौऱ्यावर असताना, नारायण राणे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले होते. आता आपण किती करणार… दोन्ही मुले कतृत्ववान असून त्यांना नांदा सौख्यभरे असा आशीवार्द देखील त्यांनी एका सभेत दिला होता.
10 Feb 2026 04:40 PM (IST)
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी 6 ’च्या घरात आता खेळाला नवं वळण आलं आहे. बिग बॉस मराठीच्या ६ व्या सीझनचा हा पाचवा आठवडा सुरू झाला आहे. घरात प्रत्येक आठवड्याबरोबर खेळ अधिकच रोचक होत चालला आहे. या आठवड्यात घरातील पहिल्या वाइल्ड कार्ड सदस्याची एन्ट्री झाली आहे. राखी सावंतच्या एन्ट्रीने घरात एक वेगळच वातावरण पाहायला मिळत आहे.राखी आल्यामुळे काही सदस्याचे खेळ बदलणार का याची उत्सुकता आला प्रेक्षकांना आहे. आज घरात Power Key चा खेळ खेळला जाणार आहे. आता या खेळात येणार आहे एक अशी संधी, जी संपूर्ण समीकरणं बदलू शकते. विशालला मिळणार आहे गेम पालटवायची सुवर्णसंधी! विशाल घरातील एखाद्या सदस्याची ताकद काढून घेऊ शकतो. पण प्रश्न हा आहे विशाल कोणाची Power Key बाद करणार?
10 Feb 2026 04:32 PM (IST)
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (State CET Cell) शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी घेण्यात येणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (MCA) आणि मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (M.HMCT) या अभ्यासक्रमांसाठी सीईटीद्वारे होणाऱ्या प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख आता १८ फेब्रुवारी २०२६ करण्यात आली आहे, अशी माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली आहे.
10 Feb 2026 03:50 PM (IST)
कलर्स मराठीवरील रिआलिटी शो बिग बॉस मराठी सीझन ६ च्या ५ व्या आठवड्यात सुरूवात झाली आहे.नुकताच घरात पहिल्या वाइल्ड कार्ड सदस्याची एन्ट्री झाली आहे. राखी सावंतच्या एन्ट्रीने घरात एक वेगळच वातावरण पाहायला मिळत आहे.राखीला पाहून काही सदस्य आश्चर्यचकित झाले आहेत. पण राखील पाहून चाहते खूश आहेत.ड्रामा क्वीन घरात आहे म्हणजे राडा आणि मनोरंजन होणार हे फिक्स आहे.आज घरात आज घरात नॉमिनेशन कार्य पार पडणार असून यामध्ये सदस्य एकेमकांचे दात घालणार घश्यात असे बिग बॉस सांगताना दिसत आहेत. या नॉमिनेशन कार्यादरम्यान वातावरण प्रचंड तापणार आहे.
10 Feb 2026 03:45 PM (IST)
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र वडिलांनीच १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी रविवारी ३२ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली. पोलीस अधिक तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या आईने शुक्रवारी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिची मुलगी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता कोणाला कसलीही माहिती न देता दूर निघून गेली असे तक्रारीत त्यांनी सांगितले. कारवाई करतांना पोलिसांनी सांगितले की, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले होते. त्यामध्ये पीडित मुलगी ही घर सोडून तिच्या आजीच्या घरी गेल्याचं उघड झालं.
10 Feb 2026 03:40 PM (IST)
भारतीय वाहन खरेदीदार जेव्हा कधी कार खरेदी करण्याच्या तयारीत असतात, तेव्हा ते पहिले कोणत्या कारवर चांगले डिस्काउंट मिळत आहे, याची शहानिशा करतात. ग्राहकांची हीच अपेक्षा लक्षात घेत, अनेक ऑटो कंपन्या नेहमीच त्यांच्या कारवर वेगवेगळे डिस्काउंट देत असतात. आता Maruti Suzuki ने देखील त्यांच्या काही कार्सवर दमदार डिस्काउंट देत आहे. जर तुम्हाला एरिना डीलरशिपद्वारे मारुतीने ऑफर केलेल्या कारपैकी एक कार खरेदी करायची असेल, तर चला जाणून घेऊयात कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळत आहे.
10 Feb 2026 03:30 PM (IST)
केजीएफ फेम यशचा नवीन चित्रपट “टॉक्सिक” १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होत असताना, हा गँगस्टर अॅक्शन-थ्रिलर चित्रपट वादात सापडला आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटावर राज्य महिला आयोग आणि प्रेक्षकांकडून त्याच्या “अश्लीलते”बद्दल आधीच टीका झाली आहे आणि आता आणखी एक वाद निर्माण झाला आहे. हा वाद, चित्रपटापेक्षाही, त्याच्या निर्मात्या, केव्हीएन प्रॉडक्शन्सशी संबंधित आहे, ज्यांच्यावर बेंगळुरूमधील वनजमिनीवर सेट बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडल्याचा आरोप आहे. कर्नाटक वन विभागाने दोन वर्षांपूर्वी २०२४ मध्ये निर्मात्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. आता, हा जुना मुद्दा रेडिटवर पुन्हा समोर आला आहे.
10 Feb 2026 03:20 PM (IST)
महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर जोरदार हल्ला केला. त्यांनी असेही म्हटले की, सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू आहे. त्यांनी आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे धाडसही दाखवले, परंतु उद्धव ठाकरे यांच्यात राहुल गांधींसमोर त्यांच्या वडिलांना “हिंदू हृदय सम्राट” म्हणण्याची हिंमतही नाही.
10 Feb 2026 03:15 PM (IST)
बॉलीवूड गायक सोनू निगम सध्या त्याच्या “दीवाना तेरा” संगीत कार्यक्रमासाठी भारतभर दौऱ्यात व्यस्त आहे. हुबळी येथे सादरीकरण करत असताना, त्याला स्टेजवर एक मुलगा आढळला जो गर्दीत हरवला होता. सोनूने त्याच्यासाठी एक गाणे तयार केले आणि त्या मुलाला अखेर त्याचा काका सापडला.
10 Feb 2026 03:10 PM (IST)
नाशिक शहरात ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. किन्नर गद्दीपतींसह दोघांनी अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल १५ लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार एका युवकाने पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली असून, संपूर्ण प्रकरणाची सत्यता पडताळून पाहिली जात आहे.
10 Feb 2026 02:50 PM (IST)
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक निरनिराळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी हास्यास्पद व्हिडिओ शेअर केले जातात तर कधी थक्क करणारे व्हिडिओज शेअर केले जातात तर कधी असे व्हिडिओ शेअर होतात जे पाहून आपलं मनं भारावून जाईल आणि असाच एक व्हिडिओ अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. आजी नातवाची जोडी फार मजेदार असते. यात प्रेम, आदर, निस्वार्थी भावना दडलेली असते जी नात्याला आणखी खास बनवत असते. नुकताच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक आज्जी आपल्या नातीकडून कथ्थक शिकत असल्याचे दिसून आले. नात फार लाडाने आपल्या आज्जीला एक एक स्टेप सांगते आणि आज्जी तसतसे करु लागते.
10 Feb 2026 02:42 PM (IST)
मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा पार पडला आहे. या कार्यक्रमाला अनेक प्रमुख चित्रपट कलाकार उपस्थित होते. गायक अदनान सामी, सलमान खान, अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी आणि रूपाली गांगुली हे देखील उपस्थित होते. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत जेवण करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी अदनान सामी यांच्यावर टीका केली. शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी त्यांच्या उपस्थितीबद्दल विशेषतः टिप्पणी केली आणि अदनान यांनी आता यावर प्रत्युत्तर दिले आहे.
10 Feb 2026 02:30 PM (IST)
स्त्री असो वा पुरुष दागिन्यांनी प्रत्येकाचं सौंदर्य खुलून दिसतं. सोन्याच्या दागिन्यांना जसं महत्व आहे तसंच चांदीच्या दागिन्यांना देखील तितकंच महत्व आहे. अनेकांना सोन्यापेक्षा चांदीचे दागिने जास्त आवडतात. पण तुम्हाला माहितेय का ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही राशी आहेत ज्यांना चांदी वर्ज्य मानली जाते. कोणत्या राशीच्या मंडळींनी कधीच चांदी वापरु नये हे जाणून घेऊयात. ज्योतिषशास्त्रानुसार चांदी हा चंद्राचा धातू मानला जातो. चंद्र मन, भावना, आई, मानसिक स्थैर्य यांचा कारक आहे. मात्र सर्व राशींना चांदी अनुकूल असेलच असे नाही. काही राशींसाठी चांदीचा अतिवापर अडचणी वाढवू शकतो.
10 Feb 2026 02:18 PM (IST)
मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात सशस्त्र दहशतवाद्यांनी अनेक घरांना आग लावली आणि गोळीबार केला. तंगखुल नागा समुदायाच्या सदस्यावर झालेल्या हल्ल्यावरून वाढत्या तणावादरम्यान ही घटना घडली. परिस्थितीला प्रतिसाद म्हणून, पुढील हिंसाचार आणि अफवा रोखण्यासाठी राज्य सरकारने जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद केली आहे. लिटन सारीखोंग गावात काही सशस्त्र बदमाशांनी अनेक घरांना आग लावल्याचे माहिती मिळत आहे. या घटनेनंतर परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती असल्याने, प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात कर्फ्यू लागू केला आहे आणि पुढील हिंसाचार आणि अफवा रोखण्यासाठी पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद ठेवल्या आहेत.
10 Feb 2026 02:10 PM (IST)
चंद्रपूर: चंद्रपूर महानगर पालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी आज मंगळवारी (दि. १०) निवडणूक आहे. काँग्रेस सध्या २७ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र दोन दिवसापूर्वी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महापौर आमचाच होणार, यासाठी सर्व तयारी झाल्याची माहिती दिली. सोबतच भाजपकडून महापौरपदासाठी संगीता खांडेकर यांना मतदान करण्यासाठी व्हिप जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान भाजपने अंतर्गत खेळी केली तर काँग्रेसच्या हातातून मनपा जाणार का? अशा चर्चा आता शहरात रंगू लागल्या आहेत.
10 Feb 2026 02:03 PM (IST)
प्रभासची ऑन-स्क्रीन उपस्थिती नेहमीच वेगळी दिली आहे, अशा उपस्थितीत त्याच्यावर कधी संवादांची जास्त गरज भासली नाही. तो त्या मोजक्या अभिनेत्यांपैकी आहे, ज्यांची केवळ उपस्थितीच एखाद्या सीनला वजनदार बनवते. विविध जॉनर आणि ॲक्शनने प्रभासने साकारलेल्या भूमिका ताकदवान, प्रभावी आणि कायम लक्षात राहणाऱ्या आहेत. अशातच आता आपण त्याच्या सात चित्रपटांच्या अशा सीन आणि लूकबद्दल जाणून घेणार आहोत जे प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहणारे आहे.
10 Feb 2026 01:55 PM (IST)
कलर्स मराठीवरील रिआलिटी शो बिग बॉस मराठी सीझन ६ च्या ५ व्या आठवड्यात सुरूवात झाली आहे.नुकताच घरात पहिल्या वाइल्ड कार्ड सदस्याची एन्ट्री झाली आहे. राखी सावंतच्या एन्ट्रीने घरात एक वेगळच वातावरण पाहायला मिळत आहे.राखीला पाहून काही सदस्य आश्चर्यचकित झाले आहेत. पण राखील पाहून चाहते खूश आहेत.ड्रामा क्वीन घरात आहे म्हणजे राडा आणि मनोरंजन होणार हे फिक्स आहे.आज घरात आज घरात नॉमिनेशन कार्य पार पडणार असून यामध्ये सदस्य एकेमकांचे दात घालणार घश्यात असे बिग बॉस सांगताना दिसत आहेत. या नॉमिनेशन कार्यादरम्यान वातावरण प्रचंड तापणार आहे.
10 Feb 2026 01:45 PM (IST)
उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळल्याचे समोर आले आहे. मृतांमद्ये पती- पत्नी, एक मुलगा आणि दोन मुलींचा समावेश आहे. मृतदेहाजवळ दुधाचे ग्लास आढळले आहेत. पाचही जणांनी दुधात विष मिसळून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. ही घटना मथुरा येथील महावनच्या खप्परपूर गावात घडली आहे.
10 Feb 2026 01:40 PM (IST)
उमेदवारांकडे मान्यताप्राप्त बोर्डातून बारावीचे गुणपत्रिका असणे आवश्यक आहे. उमेदवाराला इयत्ता १२ वी मध्ये एकूण किमान ६०% गुण असणे आवश्यक आहे. एससी/एसटी आणि ओबीसीमधील उमेदवारांना अनिवार्य प्रक्रिया म्हणून कोर्स प्रोग्राममध्ये काही टक्के सूट दिली जाते. कोणत्याही सर्वोच्च विद्यापीठात बीबीए एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी, उमेदवारांना प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे तर काही महाविद्यालये देखील गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश देतात.
10 Feb 2026 01:35 PM (IST)
जुन्या चेक-बाउन्स प्रकरणात अडकलेला बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव यांना नुकताच दिल्लीच्या तिहार तुरुंगात अटक करण्यात आली आहे. सरेंडर करण्यापूर्वी अभिनेता खूप भावुक होताना दिसून आला आणि त्याने स्पष्टपणे सांगितले की त्याच्याकडे पैसे नाहीत. आणि आता अशा परिस्थितीत बॉलीवूडचा “खरा नायक” म्हणून ओळखला जाणारा सोनू सूद पुन्हा एकदा पुढे आला आहे आणि या प्रकरणात राजपाल यादवला यांना पाठिंबा देताना अभिनेता दिसत आहे.
10 Feb 2026 01:25 PM (IST)
२०२६ च्या टी-२० विश्वचषकातील पहिल्या गट क सामन्यात नेपाळविरुद्धच्या पराभवापासून थोडक्यात बचावलेल्या इंग्लंडचा आता पुढील सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. बुधवारी मुंबईत वेस्ट इंडिजविरुद्धचा महत्त्वाचा आणि बरोबरीचा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला अधिक आत्मविश्वासपूर्ण कामगिरी करावी लागेल. दोन्ही संघांनी यापूर्वी दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे आणि स्पर्धेचे सह-यजमान आणि गतविजेते भारताप्रमाणे, ते तिसरे जेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.
10 Feb 2026 01:15 PM (IST)
घरपट्टी वसुलीबरोबरच गेल्या काही वर्षापासून नळपट्टी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या नळ धारकांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला असून, त्यासाठी प्रत्येक विभागातील बड्या थकबाकीदार असलेल्या १२०० नळ धारकांना वसुलीसाठी ‘वॉरंट’ बजावण्यात येणार आहे. या शिवाय दिडशे नळ कनेक्शन कट करण्याचे आदेशही विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. शहरात सुमारे अडीच लाखाहून अधिक नळ धारक असून, त्यांच्याकडे सुमारे ७५ कोटी रूपयांची पाणीपट्टी थकली आहे.
10 Feb 2026 01:08 PM (IST)
कलेक्टिव स्टुडिओज आणि मॅड मॅन फिल्म्सचा भाग असलेल्या रॅटपॅक स्टोरीजने नव्या प्रोडक्शन भागीदारीची घोषणा केली आहे. या सहकार्याअंतर्गत दोन फिचर चित्रपट संयुक्तपणे विकसित व निर्मिती करण्यात येणार असून, त्यांचे दिग्दर्शन निखिल भट्ट आणि साकेत चौधरी करणार आहेत. निखिल भट्ट यांच्या किल या कल्ट हिट चित्रपटाला जागतिक स्तरावर मोठी प्रशंसा मिळाली आहे, तर साकेत चौधरी हिंदी मीडियमसारख्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांसाठी ओळखले जातात. हे सहकार्य मॅड मॅन फिल्म्स आणि रॅटपॅक स्टोरीज यांना एकत्र आणते, ज्याला कलेक्टिव आर्टिस्ट्स नेटवर्कच्या इकोसिस्टमचेही सहकार्य असणार आहे.
10 Feb 2026 01:00 PM (IST)
पंजाबमध्ये ऊस उपटल्याच्या खोट्या आरोपावरून २७ वर्षीय गोरा सिंह याला बाप-लेकाने बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुख्य आरोपी अटकेत असून दुसरा फरार आहे; पोलिस तपास सुरू आहे.
10 Feb 2026 12:50 PM (IST)
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर काही तासांतच एका महिला उपायुक्तांना धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नियम व अटी माझ्या सांगण्यानुसार बदला, अन्यथा तुम्हाला बघून घेईन, अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचा आरोप भाजप शहर उपाध्यक्ष पोपट हजारे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
10 Feb 2026 12:40 PM (IST)
गुरुग्राममध्ये चोरीच्या संशयावरून चार अल्पवयीन मुलांना पीजीमध्ये ओलीस ठेवून अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. मुलांना भाजल्याचे आरोप असून दोन आरोपी अटकेत, इतरांचा शोध सुरू आहे.
10 Feb 2026 12:30 PM (IST)
पैसे दिल्यानंतरही कमी दारू आणल्यावरून झालेल्या वादात ३ आरोपींनी आपल्याच मित्राची डोक्यावर काठीने मारून हत्या केली. ही घटना पाचपावली पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. रमेश ऊर्फ वैद्य मुकुंद मसराम (वय ४०, रा. वैशालीनगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तिन्ही आरोपींना अटक केली.
10 Feb 2026 12:20 PM (IST)
सोलापुरात मोबाईलच्या किरकोळ वादातून 39 वर्षीय शेकुंबर नदाफ यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
10 Feb 2026 12:10 PM (IST)
लोणावळ्यात टेकडीवर फेरफटका मारताना पाय घसरून 26 वर्षीय प्रज्वल गिरी दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. एमपीएससीची तयारी करणाऱ्या या तरुणाच्या निधनाने मेहकरमध्ये शोककळा पसरली आहे.
10 Feb 2026 12:00 PM (IST)
Gold Investment India: सोने नेहमीच भारतीयांच्या हृदयाच्या जवळ राहिले आहे, परंतु २०२६ वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोने सुरक्षित गुंतवणुकीसाठी चर्चेचा विषय बनले आहे. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालाने बाजारात खळबळ उडाली आहे. सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, जगभरात गोल्ड ईटीएफच्या मागणीने मागील सर्व विक्रम मोडले आहेत. जानेवारी महिन्यात, जगाने नवीन वर्ष साजरे केले असताना, गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफमध्ये त्यांचे पैसे गुंतवत होते. जागतिक स्तरावर, १९ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. वाचा सविस्तर
10 Feb 2026 11:55 AM (IST)
Yavatmal Rabbi Crop Area: यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाने खरीप पिकांचे नुकसान केले असले तरी, हाच पाऊस रब्बी हंगामासाठी वरदान ठरला आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगामासाठी सरासरी ९.१३ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते, परंतु सध्या १०.४४ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. वाचा सविस्तर
10 Feb 2026 11:50 AM (IST)
कॅनडात पुन्हा एका भारतीयाचा बळी गेला आहे. कर्नाटकमधील ३७ वर्षीय टेक प्रोफेशनल चंदन कुमार राजा नंदकुमार याची कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी (०८ फेब्रुवारी) कॅनडाच्या टोरंटो येथे ही घटना घडली आहे. एका शॉपिंग मॉलच्या पार्किंगमध्ये चंदनवर हल्ला करण्यात आला होता. सध्या या प्रकरणाता कोणलाही अटक करण्यात आलेली नाही. टोरंटोच्या पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. या घटनेने चंदनच्या कुटुंबालर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
10 Feb 2026 11:45 AM (IST)
T20 World Cup 2026 Updated Points: टी-२० विश्वचषक २०२६ सुरू होऊन ३ दिवस झाले आहेत. ही स्पर्धा ७ फेब्रुवारी रोजी सुरू झाली. आतापर्यंत एकूण ९ सामने खेळले गेले आहेत. पहिला सामना ९ फेब्रुवारी रोजी इटली आणि स्कॉटलंड यांच्यात झाला, तर दुसऱ्या सामन्यात ओमान आणि झिम्बाब्वे आमनेसामने आले. तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने कॅनडाचा सामना केला. स्कॉटलंडने इटलीचा पराभव केला, तर झिम्बाब्वेने ओमानचा ८ विकेट्सने पराभव करून श्रीलंकेचा पराभव करून ग्रुप बी मध्ये पहिले स्थान पटकावले. याशिवाय दक्षिण आफ्रिकेने कॅनडाला हरवून मोठा अपसेट केला. ग्रुप डी मध्ये ते पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. वाचा सविस्तर
10 Feb 2026 11:40 AM (IST)
अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) याच्या फाइल्समधील खुलाशांमुळे ब्रिटनच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात आली आहे. यामागचे कारण म्हणजे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी एपस्टीनशी मैत्री असतानाही पीटर मॅंडेलसन यांची अमेरिकेची राजदूत म्हणून केलेली नियुक्त आहे. यावर स्टारमर यांनी त्याच्या लेबर पक्षातील खासदारांची माफी मागितली आहे. परंतु त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यांना त्यांच्या पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पुर्ण करण्याची इच्छा आहे.
10 Feb 2026 11:35 AM (IST)
Revati Sule wedding : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या घरी लवकरच लगीनसराई सुरु होणार आहे. सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांचा विवाह निश्चित झाला आहे. रेवती सुळे यांचा विवाह सारंग अरुण लखानी यांच्याशी होणार आहे . रेवती सुळे या नागपूरच्या सून होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने हा विवाह ठरला असल्याच्या देखील चर्चा आहे. वाचा सविस्तर
10 Feb 2026 11:30 AM (IST)
San Francisco Teachers Picket: अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्कोमधील शिक्षक संपावल गेले आहे. सुमारे ६००० हजार सार्वजनिक शाळेतील शिक्षकांनी हा संप पुकरला आहे. जास्त पगार, चांगले आरोग्य लाभ आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरेशा संसाधनांच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. गेल्या ५० वर्षातील हा पहिलाच संप आहे.
San Francisco’s first public school teachers strike in 47 years started today with picket lines across the city and a rally at Civic Center. Schools will remain closed on Tuesday. Read live updates: https://t.co/5iRAt8eWdu
📝: Ezra Wallach, @low___impact, @allaboutgeorge pic.twitter.com/KMylN2L3fU
— The San Francisco Standard (@sfstandard) February 10, 2026
10 Feb 2026 11:25 AM (IST)
आघाडीच्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या सॅमसंगने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F70e 5G या नावाने लाँच केला असून त्याची किंमत 13 हजार रुपयांहून कमी आहे. वाचा सविस्तर
10 Feb 2026 11:20 AM (IST)
कराड उत्तर मतदारसंघातील उंब्रज जिल्हा परिषद गटात रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय जनता पक्षाने गट पातळीवर विजय मिळवला आहे. असे असले तरी गणांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळाले आहे. बहुरंगी झालेल्या या निवडणुकीत खरी चुरस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि भाजप यांच्यातच झाली. वाचा सविस्तर
10 Feb 2026 11:13 AM (IST)
मॉरिशचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांची सोमवारी (०९ फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा झाली आहे. या संभाषणादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि मॉरिशमधील संबंध मजबूत करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात मॉरिशसचे पंतप्रधान रामगुलाम भारतात येणार आहे. यावेळी ते एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सहभागी होती. दोन्ही देशांमधील विशेष, ऐतिहासिक लोक-ते-लोक संबंध मजबूत करण्यासाठी झालेल्या कराराला या भेटीमुळे अधिक बळकटी मिळणार आहे.
10 Feb 2026 11:06 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या शेजारील देशाला निवडणुकीपर्वी एक मोठं गिफ्ट दिलं आहे. बांगलादेश आणि अमेरिकेतील व्यापार करारांतर्गत बांगलादेशी वस्तूंवरील शुल्क कमी केले आहे. यामुळे बांगलादेशला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे बांगालदेशच्या कापड उद्योगाला अमेरिकन बाजारात प्रवेश मिळणार आहे. पण ही बाब भारतासाठी धोक्याची मानली जात आहे. (वाचा सविस्तर)
10 Feb 2026 10:59 AM (IST)
चेक बाउन्स प्रकरणात नाव ढकल्यापासून अभिनेता राजपाल यादव चर्चेत आहे. कायदेशीर आणि आर्थिक अडचणींमुळे तो कठीण काळातून जात होता आणि सुमारे २५ लाख रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणात त्याला तिहार तुरुंगात शरण जाण्यास सांगण्यात आले होते. अखेर त्याने अधिकाऱ्यांसमोर शरण गेला. अलिकडच्याच एका वृत्तानुसार, अधिकाऱ्यांसमोर शरण जाण्यापूर्वी अभिनेत्याने एक भावनिक विधान केले.
10 Feb 2026 10:51 AM (IST)
आयसीसी विश्वचषकाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात नेदरलँड्स विरुद्ध नामिबिया सामन्याने होईल. नेदरलँड्सने त्यांच्या मागील सामन्यात पाकिस्तानला जोरदार टक्कर दिली होती आणि ते जिंकण्यासाठी सज्ज दिसत होते, परंतु त्यांच्या स्वतःच्या चुकांमुळे त्यांचा पराभव झाला. नेदरलँड्स विरुद्ध नामिबिया हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना सकाळी ११ वाजता सुरू होईल.
10 Feb 2026 10:43 AM (IST)
अफगाणिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या तालिबान सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे पाकिस्तानला गंभीर आर्थिक धक्का बसला आहे. तालिबानच्या अर्थ मंत्रालयाने पाकिस्तानमधून औषधांच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे अफगाणिस्तानला होणारा पाकिस्तानी औषधांचा पुरवठा पूर्णपणे थांबेल, ज्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांवर गंभीर परिणाम होण्याची अपेक्षा आहे.
10 Feb 2026 10:35 AM (IST)
कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीने वर्चस्व स्थापन केल्यानंतर मिनी मंत्रालय महणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, भाजपाला शह देत महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) पक्षाने २० जागा राखून घवघवीत यश मिळविले आहे. त्या खालोखाल काँग्रेसने १५ जागा आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. भाजपाला १२. तर शिंदे सेनेला ८ जागांवर समाधान मानावे लागले. एकंदरीत पक्षीय बलाबल पाहता कोल्हापूर जिल्हा परिषद महायुतीच्या ताब्यात राहणार हे निश्चित झाले आहे.
10 Feb 2026 10:26 AM (IST)
पैसे दिल्यानंतरही कमी दारू आणल्यावरून झालेल्या वादात ३ आरोपींनी आपल्याच मित्राची डोक्यावर काठीने मारून हत्या केली. ही घटना पाचपावली पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. रमेश ऊर्फ वैद्य मुकुंद मसराम (वय ४०, रा. वैशालीनगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तिन्ही आरोपींना अटक केली.
10 Feb 2026 10:18 AM (IST)
अटलांटिक महासागराच्या मध्यभागी वसलेले बर्म्युडा ट्रॅंगल अनेकांना आकर्षित करते. पण जगातील सर्वात सुंदर बेट कसे तयार झालं असेल? यामागे काय रहस्य दडलंय याचा कधी तुम्ही विचार केलाय का? याबाबत विविध दावे केले जातात. सहसा बेट समुद्रातील बेटांचा उगम हा ज्वालामुखीच्या उद्रेकातून किंवा पाण्याखालच्या डोंगररांगातून होतो. परंतु या बर्म्यडा ट्रॅंगलने मात्र विज्ञानाचे सर्व नियम मोडीत काढत शास्त्रज्ञांनाही आश्चर्यचकित केले आहे. अथांग समुद्राच्या मध्यभागी हे बेट नेमकं कुठून आलं? तर या प्रश्नाचं उत्तर शास्त्रज्ञांना झिंक आणि कार्बनच्या सूक्ष्म कणांमध्ये सापडलेले आहे.






