सायबर अटॅक! 19 रेल्वे स्थानकांचा वाय-फाय नेटवर्क झाला हॅक, तुम्हालाही महागात पडेल ही चूक
ब्रिटनमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर अटॅक झाला आहे. हॅकर्सनी एक दोन नाही तर चक्क 19 रेल्वे स्थानकांचे वाय-फाय नेटवर्क हॅक केलं. ब्रिटीश ट्रान्सपोर्ट पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. मात्र हे कोणामार्फत करण्यात आले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या हॅकींगचा लोकांच्या जीवनावर मात्र मोठ्या प्रमाणात परिणाम झाल आहे. अद्याप या 19 रेल्वे स्थानकांवरील वाय-फाय नेटवर्क रिस्टोअर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे स्थानकावरील वाय-फाय नेटवर्कचा वापर करू नये, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
हेदेखील वाचा- ॲप डिलीट केल्यानंतरही तुमचे डिटेल्स राहतात सेव्ह, सुरक्षेसाठी आताच फोनेमध्ये करा ही सेटिंग्ज
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लंडन, मँचेस्टर आणि बर्मिंगहॅमसह यूकेमधील 19 रेल्वे स्थानकांचे सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क हॅक करण्यात आलं. प्रवाशांनी सार्वजनिक वाय-फाय वापरण्यासाठी लॉग इन करताच, त्यांना दहशतवादी हल्ल्यांबाबत मॅसेज येऊ लागले. प्रवाशांना आलेल्या मॅसेजमध्ये विचित्र सुरक्षा इशारे आणि संशयास्पद पॉप-अप दिसत होते. या मॅसेजमुळे प्रवाशांमध्ये भिती निर्माण झाली आणि याबाबत तात्काळ सायबर सुरक्षा नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यानंतर या 19 रेल्वे स्थानकांवरील वाय-फाय नेटवर्क आता बंद करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
याप्रकरणी सायबर सुरक्षा सेलचे अधिकारी आणि पोलीस तपास करत आहेत. आपण देखील सार्वजनिक ठेिकाणी असलेला वाय-फाय वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं, गरजेचं आहे. अन्यथा आपण देखील अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यांना बळी पडू शकतो.
सायबर तज्ज्ञांच्या मते, सार्वजनिक वाय-फाय सुरक्षित नाही कारण कोणीही तिथले नेटवर्क सहज वापरू शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही सार्वजनिक वाय-फाय वापरत असाल, तर अशी कोणतीही वेबसाइट उघडू नका जिथून तुमची वैयक्तिक माहिती लीक होऊ शकते.
ऑटो वाय-फाय नेटवर्कच्या मदतीने, तुमचा फोन कोणत्याही सार्वजनिक वाय-फायशी कनेक्ट होतो. पण तुम्हाला माहित आहे का की असे करणे तुमच्या फोनसाठी धोकादायक देखील असू शकते. हॅकर्स पब्लिक वायफायच्या मदतीने तुमची खाजगी किंवा वैयक्तिक माहिती सहजपणे चोरू शकतात. म्हणून, आपण नेहमी ऑटो कनेक्शन बंद ठेवले पाहिजे.
हेदेखील वाचा- सोशल मिडीयापासून सुटका मिळवण झालंय अवघड? या सोप्या टीप्स तुम्हाला मदत करतील
जेव्हा तुम्ही सार्वजनिक वाय-फाय वापरता तेव्हा नेहमी विश्वसनीय नेटवर्क वापरा. अनेक वेळा स्कॅमर वापरकर्त्यांचा डेटा चोरण्यासाठी त्यांच्या हॉटस्पॉटचे नाव WiFi असे सेट करतात. जेव्हा जेव्हा वापरकर्ता या नेटवर्कशी कनेक्ट होतो तेव्हा हॅकर्स युजर्सचा वैयक्तिक डेटा हॅक करतात.
सार्वजनिक वाय-फायशी कनेक्ट केल्यावर, तुम्हाला त्याद्वारे बँकेशी संबंधित कोणतेही काम न करण्याचा सल्ला दिला जातो. अनेक वेळा, याच्या आडून, हॅकर्स तुमच्या फोनवरून तुमचे बँकिंग डिटेल्स आणि लॉगिन डिटेल्स चोरतात. हॅकर्स सार्वजनिक वाय-फायच्या मदतीने तुमची सर्व वैयक्तिक माहिती चोरतात.
सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कवर तुमची माहिती संरक्षित करण्यासाठी VPN वापरा. एक VPN सुरक्षित एनक्रिप्टेड नेटवर्कद्वारे तुमचा डेटा री-रूट करतो. तुम्ही सर्व प्लॅटफॉर्मवर VPN ॲप्स शोधू शकता, मग ते Android, iOS, Windows किंवा macOS असो.