आयफोन युजर्ससाठी खुशखबर! लवकरच रिलीज होणार iOS 18.1 अपडेट; या स्मार्टफोन्सला होणार फायदा
अॅपलने काही दिवसांपूर्वीच आयफोनसाठी iOS 18 अपडेट जारी केले होते. अॅपलने जारी केलेल्या या अपडेटमध्ये ॲपल इंटेलिजेंस फीचर्स उपलब्ध नव्हते. कारण, कंपनी त्याच्या जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस (Gen AI) वैशिष्ट्यातील संभाव्य बग्स दूर करण्यावर काम करत होती. आता कंपनीबद्दल अशी बातमी आहे की ती लवकरच AI वैशिष्ट्यांसह सुसज्ज ऑपरेटिंग सिस्टमचे अपडेट जारी करू शकते. हे अपडेट म्हणजेच iOS 18.1 अपडेट असणार आहे.
हेदेखील वाचा- मायक्रोसॉफ्टने लाँच केला नवीन AI एजंट, सेल्स-फाइनांसपासून अकाउंटिंगपर्यंत करणार मदत
आयफोन 16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो, आयफोन 16 प्रो मॅक्स, आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो, आयफोन 15 प्रो मॅक्स, आयफोन 14, आयफोन 14 प्लस, आयफोन 14 प्रो, आयफोन 14 प्रो मॅक्स, आयफोन 13, आयफोन 13 मिनी, आयफोन 13 प्रो, आयफोन 13 प्रो मॅक्स, आयफोन 12, आयफोन 12 मिनी, आयफोन 12 प्रो, आयफोन 12 प्रो मॅक्स, आयफोन 11, आयफोन 11 प्रो, आयफोन 11 प्रो मॅक्स, आयफोन Xs,आयफोन Xs मॅक्स, आयफोन Xr, आयफोन SE (फोटो सौजन्य – X)
अॅपलने त्यांच्या नोंदणीकृत डेवपलप्स आणि सार्वजनिक सॉफ्टवेअर टेस्टर्ससाठी iOS 18.1 रिलीझ कॅन्डिडेट (RC) वर्जन सादर केली आहे. बीटा चाचणी दरम्यान आढळलेल्या बगचे निराकरण केल्यानंतर कंपनी RC वर्जन रिलीज करत आहे. हे शक्य आहे की अॅपल लवकरच आपल्या वापरकर्त्यांसाठी iOS 18.1 अपडेट जारी करेल. पुढील आठवड्यापर्यंत हे अपडेट आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
अॅपलच्या नवीनतम iOS 18.1 अपडेटचे शेड्यूल कंपनीच्या मागील वर्षाच्या पॅटर्नशी जुळते. कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या शेवटी आयफोनसाठी एक मोठे अपडेट आणले होते. RC वर्जन रोलआउट केल्यानंतरच वापरकर्त्यांना ओएस अपडेट सादर केले जाते. काही रिपोर्ट्सनुसार, अॅपल डिव्हाईसना 28 ऑक्टोबरला नवीन अपडेट मिळू शकते. यासाठी एक किंवा दोन दिवस जास्त लागण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा- स्पॅम आणि फेक कॉल्सपासून आयफोन युजर्सची सुटका, ॲपलने घेतला महत्त्वाचा निर्णय
एकीकडे, अॅपल आपल्या युजर्ससाठी iOS 18.1 रोल आउट करणार असल्याचं समोर आलं आहे. त्याच वेळी, याबद्दल बातमी आहे की ते लवकरच या सॉफ्टवेअरचे पुढील वर्जन म्हणजेच iOS 18.2 कंपनी लवकरच डेवलपर्स आणि सार्वजनिक सॉफ्टवेअर टेस्टर्ससाठी रिलीज करू शकते. मीडिया रिपोर्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, iOS 18.2 चा पहिला बीटा 29 ऑक्टोबरला रिलीज होऊ शकतो.
अॅपल सर्वात आधी डेवलपर्ससाठी iOS 18.2 चा बीटा रिलीज करेल. यानंतर ते या ऑपरेटिंग सिस्टमचे बीटा वर्जन सार्वजनिक टेस्टर्ससाठी रिलीज करेल. बीटा व्हर्जनमध्ये यूजर्स ॲपलच्या आगामी फीचर्सचा वापर करू शकतील. या अपडेट्समध्ये कंपनीचे लक्ष अॅपल इंटेलिजेंस फिचर्स सुधारण्यावर आहे.
सामान्य वापरकर्त्यांसाठी नवीन सॉफ्टवेअर अपडेट जारी करण्यापूर्वी, कंपनी त्याची अनेक टप्प्यांत चाचणी करते. कोणत्याही सॉफ्टवेअरची बीटा वर्जन चाचणी टप्प्यात आणली जाते. सर्व दोषांचे निराकरण केल्यानंतर, कंपनी सामान्य लोकांना फायनल स्टेबल वर्जन ऑफर करते.