फोटो सौजन्य: Pinterest
भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकीने अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. कंपनीने मिड साइझ एसयूव्ही म्हणून मारुती ग्रँड विटारा ही ऑफर करते. डेल्टा या एसयूव्हीच्या सीएनजी प्रकारात उपलब्ध आहे. जर तुम्ही Maruti Grand Vitara चा CNG व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तीन लाखांच्या डाउन पेमेंटनंतर तुम्हाला दरमहा किती EMI द्यावा लागेल त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
Volvo च्या ‘या’ कारमध्ये अचानक झाला बिघाड! कंपनीने 40 हजारांहून अधिक युनिट्स बोलावले परत
Maruti Suzuki कडून Maruti Grand Vitara चा CNG पर्याय म्हणून Delta व्हेरिएंट ऑफर केला जातो. कंपनी ही मिड-साइज एसयूव्ही CNG व्हर्जनमध्ये 12.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत विक्रीसाठी देते.ही कार खरेदी केल्यास 12.99 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीव्यतिरिक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्सचा खर्चही भरावा लागेल. यामध्ये सुमारे 1.30 लाख रुपये रजिस्ट्रेशन टॅक्स, अंदाजे 60 हजार रुपये इन्शुरन्स आणि जवळपास 13 हजार रुपये TCS शुल्क द्यावे लागते. या सर्व खर्चानंतर कारची दिल्लीतील ऑन-रोड किंमत सुमारे 15.03 लाख रुपये इतकी होते.
जर तुम्ही Grand Vitara Delta CNG व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बँकेकडून सामान्यतः एक्स-शोरूम किमतीवरच कर्ज दिले जाईल. अशा परिस्थितीत 3 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर उर्वरित सुमारे 12.03 लाख रुपये बँकेकडून कर्ज म्हणून घ्यावे लागेल.
समजा बँक 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांच्या कालावधीसाठी 12.03 लाख रुपयांचे कर्ज देते, तर तुम्हाला दरमहा सुमारे 19,359 रुपये EMI भरावा लागेल. हा EMI पुढील सात वर्षे नियमितपणे द्यावा लागेल.
Test Drive दरम्यान Accident झाला तर खिशातून पैसे द्यावे लागतात का? जाणून घ्या काय सांगतात नियम
9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 12.03 लाखांचे कर्ज घेतल्यास, सात वर्षांत तुम्ही अंदाजे 4.22 लाख रुपयांचा व्याज तुम्हाला भरावा लागेल. म्हणजेच एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि एकूण व्याज मिळून या कारची एकूण किंमत सुमारे 19.26 लाख रुपये इतकी होईल.






