Tech Tips: आयफोनचा पासवर्ड लीक झाला? वेळ वाया घालवू नका, लगेच फॉलो करा 'या' 4 सुरक्षा टिप्स
आपल्या स्मार्टफोनमध्ये आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित राहावी, यासाठी पासवर्डचा वापर केला जातो. आपण आपल्या प्रत्येक डेटासाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड ठेवतो. जेणेकरून हॅकर्स आपला डेटा हॅक करू नयेत. पण तुमचे पासवर्डची लिक झाले तर तुमच्या अकाउंटला मोठा नुकसान होऊ शकतो. तुमचा सर्व डेटा लीक होऊ शकतो. एप्पलने सांगितलं आहे की, 2022 आणि 2023 मध्ये 2.6 अब्ज वैयक्तिक रेकॉर्डची चोरी झाली होती. यामधील अनेक रेकॉर्ड्स सायबर गुन्हेगारांनी एक्सेस केले होते. अशा परिस्थितीत जर तुमच्या आयफोनवर पासवर्डबाबत कोणतीही नोटिफिकेशन आली तर अशावेळी कोणतीही तडजोड न करता सर्वात आधी तुमची सुरक्षा लक्षात घ्या आणि योग्य ती पाऊल उचला.
जर तुम्हाला तुमच्या आयफोनमध्ये डेटा लिक झाल्याची नोटिफिकेशन मिळाली, तर लगेचच कोणताही विचार न करता सर्वात आधी तुमचा पासवर्ड बदला. ज्यामुळे तुम्ही तुमचं नुकसान होण्यापासून वाचू शकता. पासवर्ड बदलण्यासाठी सर्वात आधी एप्पलच्या पासवर्ड ॲपची सिक्युरिटी ओपन करा. इथे तुम्हाला कॉम्प्रमाईज पासवर्ड दिसतील. यानंतर चेंज पासवर्डवर टाईप करा आणि नवीन आणि मजबूत पासवर्ड सेट करा. (फोटो सौजन्य – Pinterest)
टू फॅक्टर ऑथेंटिकेशन तुमच्या अकाउंटची सुरक्षा अधिक मजबूत ठेवण्यासाठी मदत करते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा पासवर्ड धोक्यात आहे किंवा तुमचा डेटा लिक होऊ शकतो, तर तुमच्या अकाउंटमध्ये टू फॅक्टर ऑथेंटीकेशन ऑन करा. टू फॅक्टर ऑथेंटीकेशन ऑन केल्यानंतर तुमच्या पासवर्डला आणखी एका वेरिफिकेशनची गरज लागणार आहे. ज्यामुळे जर कोणी लॉगिन करण्याचा प्रयत्न केला तर सर्वात आधी तुम्हाला इमेलवर एक कोड पाठवला जाईल आणि या कोडशिवाय लॉगिन करणे अशक्य आहे.
जर तुमचा पासवर्ड धोक्यात असेल तर तुम्ही अकाउंट ऍक्टिव्हिटी रिव्ह्यू करू शकता. यामुळे तुम्हाला समजेल की तुमच्या अकाउंटमधून कोणतेही संशयास्पद ट्रांजेक्शन किंवा अनाधिकृत लॉगिन केले आहे की नाही. जर तुम्हाला काही संशयास्पद वाटल्यास तुम्ही त्वरित योग्य ती पावलं उचलून तक्रार दाखल करू शकता.
अकाउंट सेक्योरिटी अधिक मजबूत करण्यासाठी तुमचा पासवर्ड वेगळा आणि मजबूत असणं अत्यंत गरजेचे आहे. पण जेव्हा आपण मजबूत आणि वेगळा पासवर्ड ठेवतो, सर्वात मोठी समस्या अशी निर्माण होते की आपल्याला तो पासवर्ड लक्षातच राहत नाही. अशा परिस्थितीत आपण पासवर्ड मॅनेजरचा वापर करू शकतो. हे एक एनक्रिप्टेड वॉल्टमध्ये पासवर्ड स्टोअर करते. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या अकाउंटसाठी युनिक पासवर्ड ठेवणे अगदी सहज शक्य होतं.