महिलांमध्ये दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांमुळे कोणत्याही क्षणी करावी लागेल Angioplasty
जगभरात हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तरुण वयातील मुलामुलींना हार्ट अटॅक येतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत तेलकट किंवा तिखट खाणे, जंक फूड, मानसिक तणाव आणि अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. पण काहीवेळा शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीरात अनेक वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. पण या लक्षणांकडे सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता शरीरात होणाऱ्या बदलांकडे तातडीने लक्ष देऊन शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात साचून राहिलेल्या खराब कोलेस्टरॉलमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांना इजा पोहचते.(फोटो सौजन्य – istock)
हार्ट अटॅक आल्यानंतर कोणत्याही क्षणी मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल संपूर्ण शरीराला हानी पोहचते. यामुळे हार्ट ब्लॉकेज होऊन एंजियोप्लास्टी करून वेळ येऊ शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला महिलांमध्ये हार्ट अटॅकची कोणतेही लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एंजियोप्लास्टी प्रक्रियेमुळे लाखो लोकांना नवजीवन मिळाले आहे.
रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर चालताना किंवा फिरताना छातीमध्ये वेदना होणे, जळजळ वाटणे, दडपण आल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. ही समस्या हृदयाच्या जवळ असलेल्या स्नायूंना पुरेसे रक्त न मिळाल्यामुळे उद्भवते. हार्ट ब्लॉकेज झाल्यानंतर प्रामुख्याने शरीरात ही लक्षणे दिसून येतात. अशावेळी डॉक्टरसुद्धा एंजियोप्लास्टी करण्याचा सल्ला देतात.
चालताना किंवा झोपल्यानंतर पायांमध्ये वारंवार वेदना होत असतील तर दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषध उपचार करावेत. ही रिफेरल आर्टरी डिसीजची लक्षणे असू शकतात. पायांच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर पायांच्या स्नायूंना योग्य रक्तपुरवठा होत नाही, ज्यामुळे चालताना पाय खूप दुखतात.
हृद्यासंबंधित आजाराची शरीराला लागण झाल्यानंतर शरीरात मोठ्या प्रमाणावर थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो. कोणतेही काम करताना किंवा कुठेही गेल्यानंतर लगेच थकल्यासारखे वाटते. श्वास घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्रास होणे, झोपल्यानंतर अस्वस्थपणा जाणवणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण होतात.
हृदयविकाराचा झटका म्हणजे काय?
हृदयविकाराचा झटका (Myocardial Infarction) तेव्हा येतो जेव्हा हृदयाला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणार्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्याने ब्लॉकेज (अडथळा) निर्माण होतो. यामुळे हृदयाच्या पेशींना ऑक्सिजन न मिळाल्याने त्या मरू लागतात.
हृदयविकाराच्या झटक्याची सामान्य लक्षणे कोणती आहेत?
तीव्र किंवा हलके दुखणे, दाब, जडपणा किंवा जळजळ जाणवणे. काहीवेळा छातीत दुखण्याशिवायही हे लक्षण दिसू शकते. पूर्वी सहज करता येणाऱ्या कामांमध्ये अचानक खूप थकवा जाणवणे.
हृदयविकाराच्या झटक्याची कारणे कोणती आहेत?
जास्त चरबी, मीठ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे.उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार हृदयविकाराचा धोका वाढवतात.कुटुंबात कोणाला लवकर हृदयविकाराचा झटका आला असेल, तर धोका वाढतो.