जिओ घेऊन आलाय 448 रुपयांच्या किंमतीत बेस्ट रिचार्ज प्लॅन! दररोज 2GB डेटा आणि 12 OTT अॅप्सचा अॅक्सेस मिळणार
जिओने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 12 ओटीटी अॅप्सचा अॅक्सेस मिळणार आहे. जिओचा हा प्लॅन युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. सध्या सर्वच टेलिकॉम कंपन्या महागडे रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत. त्यामुळे अशावेळी सर्व फायद्यांसह कमी किंमतीत रिचार्ज प्लॅन शोधणे हे एक मोठे आव्हान आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
ज्या युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, सुपरफास्ट इंटरनेट डेटा आणि ओटीटी अॅप्सच्या अॅक्सेससह डाटा प्लॅन पाहीजे असेल, त्यांच्यासाठी आता जिओने एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये जिओ युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, सुपरफास्ट इंटरनेट डेटा आणि ओटीटी अॅप्सची मेंबरशिप मिळणार आहे. या प्लॅनची किंमतही कमी आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडीटसह अनेक फायदे उपलब्ध आहेत. प्लॅनमध्ये, युजर्सना 28 दिवसांसाठी दररोज 2 GB फास्ट स्पीड डेटा दिला जातो. दैनंदिन डेटा पॅक संपल्यानंतर, युजर्स अनलिमिटेड 5G डेटाचा आनंद घेऊ शकतात. मात्र त्याची स्पीड 64Kbps आहे.
या प्लॅनची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्लॅन अॅक्टिव्ह केल्यानंतर, तुम्हाला ओटीटी ॲप्सचे वेगळे सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही. कारण या प्लॅनमध्ये एकूण 12 ओटीटी ॲप्सचे सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. तुम्ही Sony Liv, Zee5, Jio Cinema Premium, Lionsgate play आणि Discovery+ 28 दिवसांसाठी वापरू शकता.
448 रुपये किमतीचा हा प्लॅन एका महिन्यासाठी अनलिमिटेड कॉलिंग सुविधा प्रदान करतो. तसेच या प्लॅनमध्ये स्थानिक आणि STD कॉल्सच्या फायद्यांचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. युजर्स दररोज 100 एसएमएस पाठवू शकतात.
यासोबतच Jio च्या या प्लानमध्ये JioTV Premium आणि JioCloud चे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. JioTV Premium सह, युजर्सना एकाधिक टीव्ही चॅनेल आणि मागणीनुसार कंटेट पाहण्याची संधी मिळणार आहे. यासह, JioCloud वापरकर्त्यांना त्यांचा डेटा क्लाउडमध्ये सेव्ह करण्याची परवानगी देतो.
जिओसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
व्हॅलिडीटी: 28 दिवस
डेटा: दररोज 2GB डेटा, एकूण 56GB
कॉलिंग: अनलिमिटेड कॉलिंग
5G डेटा: कंपनीची 5G सेवा आहे त्या ठिकाणी अनलिमिटेड ट्रू 5G एक्सेस
ओटीटी सबस्क्रिप्शन: Sony LIV, ZEE5, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT यासह 12 हून अधिक OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन या प्लॅनमध्ये उपलब्ध
एसएमएस: दररोज 100 एसएमएस
जिओच्या 11 रुपयांच्या हाय स्पीड डेटा प्लॅनची व्हॅलिडीटी 1 तासाची आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 1 तासासाठी हाय स्पीड इंटरनेट अनलिमिटेड डेटा दिला जातो. ज्या युजर्सना कमी वेळसाठी जास्त इंटरनेट डेटाची आवश्यकता असते, अशा युजर्ससाठी हा प्लॅन फायदेशीर आहे.