डोळ्यांपासून किती अंतरावर असावा तुमचा मोबाईल (फोटो सौजन्य - pinterest)
सध्या प्रत्येकजण मोबाईलच्या आहारी गेला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाला त्यांच्या हातात मोबाईल हवा असतो. मोबाईल शिवाय आपली अनेक कामं रखतात, मोबाईल आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे, हे सर्व जरी खंर असलं तरी मोबाईलचा अतिवापर आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. सतत मोबाईलचा वापर केल्याने आपल्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. आपल्याला डोळ्यांचा आजार होण्याची देखील शक्यता निर्माण होते.
हेदेखील वाचा- तुमच्या जुन्या मोबाईलचा बॉक्स फेकून देताय तर आत्ताच थांबा नाहीतर होईल मोठा फ्रॉड!
मोबाईलमुळे डोळ्यांवर परिणाम होण्याची सर्वात महत्त्वाची दोन कारणं म्हणजे मोबाईलचा अतिवापर आणि मोबाईलची स्क्रीन डोळ्यांजवळ असणे. दिर्घकाळ मोबाईलचा वापर केल्याने थकल्यासारखे वाटणे, डोळ्यांना खाज सुटणे आणि डोळे कोरडे होणे किंवा अंधुक दृष्टी आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. फोन वापरताना आपल्या डोळ्यांपासून फोनची स्क्रिन किती अंतरावर असावी आणि फोन वापरण्याची योग्य पध्दत कोणती, हे अनेकांना माहिती नसतं. त्यामुळे लोकांना डोळ्यांशी संबंधित आजारांना तोंड द्यावं लागतं. अशा परिस्थितीत चष्मा लागणे, डोळ्यांचे ऑपरेशन किंवा काहीवेळी दिर्घकाळीन समस्या देखील उद्धभवू शकतात. तुम्ही जर सतत स्मार्टफोनचा वापर करत असाल तर योग्य काळजी घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला देखील डोळ्यांशी संबंधित आजारांना तोंड द्यावं लागू शकतं.
मोबाईलमधून येणारा प्रकाश डोळ्यांसाठी हानिकारक
मोबाईलमधून येणारा प्रकाश आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक असतो. हा प्रकाश सतत आपल्या डोळ्यांवर पडत राहिल्यास आपल्याला डोळ्यांशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात. मोबाईलवर गेम्स, सिनेमा पाहणे, व्हिडीओ कॉलिंग, अशी विविध कामं सुरु असतात. पण यामुळे सतत आपला मोबाईल आपल्या डोळ्यासमोर राहतो आणि मोबाईलमधून निघणारा प्रकाश आपल्या डोळ्यांवर पडत राहतो. हा प्रकाश डोळ्यांसाठी आणि रेटिनासाठी धोकादायक ठरू शकतो.
हेदेखील वाचा- आश्चर्यकारक! रोबोट करणार किडनी ट्रांसप्लांट; अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये झाली सुरुवात
डोळे आणि फोनमधील योग्य अंतर
काही लोकं त्यांचा स्मार्टफोन त्यांच्या चेहऱ्यापासून 8 इंचाच्या अंतरावर ठेवतात. पण यामुळे तुमच्या डोळ्यांवर ताण येऊन तुम्हाला डोळ्यांचे आजार होऊ शकतात. तुमचा फोन जवळ ठेवल्याने डोळ्यांना खूप नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुमचे डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्या फोन आणि डोळ्यांमधील अंतर सुमारे 16 ते 18 इंच इतकं असावं.
20-20-20 नियमाचे पालन करा
दिर्घकाळ मोबाईलचा वापर केल्याने थकल्यासारखे वाटणे, डोळ्यांना खाज सुटणे आणि डोळे कोरडे होणे किंवा अंधुक दृष्टी आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्धभवतात. अशा वेळी 20-20-20 नियमाचे पालन करणे फायदेशीर ठरते. 20-20-20 नियमानुसार, दर 20 मिनिटांनी, 20 सेकंदांसाठी, 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे तुमच्या स्क्रीनपासून दूर पहा. यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळतो.
सतत डोळे मिचकावणे
स्मार्टफोनकडे दिर्घकाळासाठी टक लावून पाहणे अत्यंत धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे स्मार्टफोनकडे पाहताना अनेकदा तुमचे डोळे मिचकवा. डोळे मिचकावणे तुम्हाला दोन प्रकारे मदत करते. सर्वप्रथम, डोळे मिचकावल्याने तुमचे डोळे ओलसर राहून कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. दुसरे म्हणजे, तुमचे डोळे मिचकावणे पुन्हा फोकस करण्यात मदत करते. 15 मिनिटांत सुमारे 10 वेळा डोळे मिचकावणे हे आरोग्यदायी मानले जाते.