पंजाब किंग्स संघाकडून पंजाब पुरग्रस्ताना मदत (फोटो-सोशल मीडिया)
Punjab Floods : उत्तर भारतात मुसळधार पावसाने ने उत्तराखंडपासून ते जम्मू-काश्मीरपर्यंत चांगलाच हाहाकार माजवला आहे. हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये देखील पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. पंजाबमधील परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. त्यामुळे या राज्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. यामध्ये बहुतांश गावे पाण्याखाली गेली आहेत. यामुळे जीवित हानी सोबत वित्त हानी देखील झाली आहे. अशा परिस्थितीत पंजाबला मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. अनेक क्षेत्रातून मदतीचे हात येऊ लागले आहे. आता या मदतीसाठी आयपीएलचा संघ देखील पुढे आला आहे. आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्ज संघाने गुरुवारी एक निवेदन जारी करून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. पंजाब संघाकडून सुमारे ३४ लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे. तसेच क्राउड फंडिंगद्वारे निधी उभारण्याची मोहीम देखील सुरुवात करण्यात आली आहे.
हेही वाचा : नवीन GST slab चा क्रिकेट चाहत्यांना बसणार फटका! IPL 2026 मध्ये तिकिटांच्या किमतीत पडेल ‘इतकी’ भर
पंजाब किंग्जकडून सोशल मीडियावर एक निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ते राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध हेमकुंड फाउंडेशन आणि आरटीआयशी जुळत आहेत. फ्रँचायझीकडून सांगण्यात आले की, मदतकार्य शक्य तेवढे पोहचवण्यासाठी, त्यांनी या दोन्ही संस्थांच्या सहकार्याने ‘टुगेदर फॉर पंजाब’ मोहीम सुरू केली आहे. यासाठी पंजाब किंग्जने स्वतः प्रथम या संस्थांना ३३.८ लाख रुपये देण्याचे जाहीर केले.
Together for Punjab! ♥️#PunjabKings pic.twitter.com/yb0ZwtC9DF
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) September 4, 2025
पंजाबमधील अनेक गावे पुरामुळे बाधित झाले आहेत. सतेच शहरांमध्ये पुरामुळे परिस्थिती खूपच बिकट झाली आहेत. लोकांसह गुरेढोरे वाचवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. हजारो एकर शेतीही पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने पिकांची मोठी नासाडी झाली आहे. अशा वेळी, पंजाब किंग्जकडून मदतीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. फ्रँचायझीकडून सांगण्यात आले की, या निधीद्वारे बचाव बोटी खरेदी करण्यात येणार आहेत, ज्याचा वापर पूरग्रस्त भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी करण्यात येईल, त्यासोबतच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत त्यांचा वापर करण्यात येईल. याशिवाय, या निधीचा वापर पुर बाधित लोकांना आवश्यक वस्तू आणि स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी देखील केला जाणार आहे.
हेही वाचा : Duleep Trophy 2025 : नारायण जगदीसनच्या शतकाने दक्षिण विभागाला तारले! उपांत्य फेरीत उत्तर विभागाचे गोलंदाज निष्फळ
आयपीएल संघ पंजाब किंग्जकडून ऑनलाइन क्राउड फंडिंग मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे. ज्याद्वारे फ्रँचायझीने १५ सप्टेंबरपर्यंत २ कोटी रुपये उभारण्याचे टार्गेट ठेवले आहे. टीमकडून सांगण्यात आले आहे की, हा निधी ‘ग्लोबल शीख चॅरिटी’ला दिला जाणार आहे. जो पूरग्रस्त भागात मदत करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच पंजाब किंग्जने त्यांच्या चाहत्यांना आणि सामान्य लोकांना या ऑनलाइन निधीमध्ये देणगी देण्याबाबत आवाहन देखील केले आहे.