श्रेया घोषाल महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये सादरीकरण करणार(फोटो-सोशल मीडिया)
ICC Women’s Cricket World Cup 2025 : महिला विश्वचषक स्पर्धेला ३० सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. महिला विश्वचषक २०२५ च्या उद्घाटन समारंभात भारताची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल गाणार आहे. ती गुवाहाटी येथे होणाऱ्या उद्घाटन समारंभात सादरीकरण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
श्रेया घोषालने या स्पर्धेचे अधिकृत गाणे ‘ब्रिंग इट होम’ गायले आहे. तसेच ती भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या सामन्यापूर्वी ती थेट सादरीकरण देखील करणार आहे. तिच्या सादरीकरणातून महिला क्रिकेटची ऊर्जा, आत्मा आणि एकता साजरी करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या तिकिटे आणि उद्घाटन समारंभाशी संबंधित माहिती आयसीसीला देण्यात आली आहे. यावेळी महिला विश्वचषक भारतातील चार शहरांमध्ये आणि श्रीलंकेतील कोलंबोमध्ये खेळवण्यात येणार आहे.
आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेची एक विशेष गोष्ट म्हणजे तिकिटांची किंमत खूपच कमी ठेवली गेली आहे. भारतात, लीग सामन्यांसाठी तिकिटांची किंमत फक्त १०० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. जी सुमारे १.१४ अमेरिकन डॉलर्स इतकी असणार आहे. यामुळे स्टेडियममध्ये अधिक गर्दी आणि उत्साह वाढताना दिसेल आणि सहाजिकच महिला क्रिकेटला आणखी चालना देखील मिळण्यास मदत होईल.
यावेळी गुगल पे हे क्रिकेट चाहत्यांना एक खास संधी ऑफर करणार आहे. याद्वारे, प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी आणण्यासाठी तिकिटे खरेदी करण्याची पहिली संधी दिली जाणार आहे. तिकिट विक्री गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता (IST) सुरू होणार आहे.
सर्वप्रथम, गुगल पे वापरकर्त्यांसाठी चार दिवसांची एक्सक्लुझिव्ह प्री-सेल विंडो उघडणार असून जी सोमवार, ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजतापर्यंत चालणार आहे. या दरम्यान, गुगल पे वापरकर्ते Tickets.cricketworldcup.com या वेबसाइटला भेट देऊन तिकिटे खरेदी करू शकणार आहे.
यानंतर सार्वजनिक तिकिट विक्रीचा दुसरा टप्पा हा मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता (IST) सुरू करण्यात येणार आहे. या टप्प्यात, सर्वांना तिकिटे खरेदी करण्यास उपलब्ध असणार आहे. पहिल्या टप्प्यात, फक्त राउंड-रॉबिन लीग सामन्यांची तिकिटे उपलब्ध करण्यात येणार आहेत आणि फक्त गुगल पे वापरकर्तेच ती खरेदी करू शकणार आहेत.
गुवाहाटीमध्ये उद्घाटन समारंभ होणार आहे.हा समारंभ क्रिकेट, सक्षमीकरण आणि संगीताचा रंगीत आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध उत्सव असणार आहे. प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचे सादरीकरण होणार असून थीम असलेली दृश्ये आणि ग्राउंड अॅक्टिव्हेशनसह, महिला क्रिकेटच्या या महिनाभर चालणाऱ्या उत्सवाची एक उत्तम सुरुवात असणार आहे.
हेही वाचा : Punjab Floods : ‘हा’ IPL संघ बनला तारणहार! पंजाब पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात