अहिल्यानगरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध मंडळांकडून वेगवेगळ्या धार्मिक व सामाजिक विषयांवर देखावे उभारण्यात आले आहेत. यामध्ये नवयुग मित्र मंडळाने उभारलेली उज्जैन येथील श्री महाकाल मंदिराची ६५ फूट उंच भव्य प्रतिकृती विशेष आकर्षण ठरत आहे. ही प्रतिकृती पाहण्यासाठी नगरकरांसह परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. ज्यांना प्रत्यक्ष उज्जैनला जाऊन दर्शन घेणे शक्य नाही, अशा भाविकांना नगरमध्येच महाकालाचे साक्षात दर्शन झाल्याचा अनुभव मिळत आहे. अनेक भाविकांनी या प्रतिकृतीकडे पाहून “महाकाल नगरमध्येच अवतरले” अशा भावना व्यक्त केल्या आहेत. या प्रतिकृतीच्या निर्मितीसाठी मंडळाला तब्बल एक महिन्याचा कालावधी लागला आहे. मंडळाचे अध्यक्ष परेश लोखंडे यांनी सांगितले की, धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक संदेश देण्याचे कार्यही मंडळ सातत्याने करत असते.