गुगल पे (Google Pay) जगातील सर्वात लोकप्रिय पेमेंट ऍप्सपैकी एक आहे. वाढत्या तंत्रज्ञानानुसार, डिजिटल पेमेंटचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच आहे. यासोबतच आता बहुसंख्य लोक हे आपल्या डिजिटल पेमेंटसाठी अधिकतम गुगल पे वापरताना दिसतात. गुगल पे ॲपद्वारे तुम्ही कुठेही आणि कधीही पेमेंट करू शकता. गुगल नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवनवीन ऑफर्स आणि फीचर्स घेऊन येत असतं. त्यातच आता गुगल ॲपवर अशाच एका नवीन फीचरचे आगमन झाले आहे. या फीचरद्वारे आता पेमेंट करणे आणखीन सोपे होणार आहे.
काय आहे नवीन फिचर:
नुकतेच गुगलचे नवीन फीचर आले असून यामुळे आता पेमेंट करणे आणखीन सोपे होणार आहे. कारण युजर्सना एकाचवेळी तीन फिचर्स मिळणार आहेत. यातील सर्वात अप्रतिम फिचर म्हणजे ‘Buy Now Pay Later’ फिचर. या फीचरनुसार आता युजर्सच्या बँक अकाउंटमध्ये पैसे नसतानाही तुम्हाला दुकानदाराला पैसे देता येणार आहे. या नवीन फिचरची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
अनेकदा असा होत की, कोणत्या महत्त्वपूर्ण वस्तूसाठी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं असत मात्र मग लक्षात येत की आपल्या खात्यात पैसेच नाही आहेत. अशावेळी दुकानदारासमोर आपली चांगलीच फिजीती होते. मात्र आता या फीचर्सद्वारे तुमच्यासोबत असे कधीच होणार नाही. आता तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नसलॆ तरीसुद्धा निसंकोचपणे तुम्ही पेमेंट करू शकता.
[read_also content=”लोहासारखी कडक बॉडी, दमदार फीचर्ससह Infinix चा नवीन गेमिंग फोन लाँच https://www.navarashtra.com/technology/infinixs-new-gaming-phone-launched-with-a-solid-features-537587.html”]
हे फिचर कसे काम करते:
या फीचरनुसार, जेव्हा तुम्ही पेमेंट कराल तेव्हा तुमच्या खात्यातून पैसे जाणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला Installment हा पर्याय निवडावा लागेल. म्हणजेच तुम्ही हफ्त्यांमध्ये हळूहळू पेमेंटदेऊ शकता. साधारणतः हे फिचर एकप्रकारे तुमच्यासाठी क्रेडिट कार्ड म्हणून वापरता येणार आहे. अनेकांसाठी हे फिचर एक चांगला पर्याय म्हणून समोर येऊ शकतो.






