अष्टपैलू साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेमध्ये अभूतपूर्वी अशी साहित्यनिर्मिती केली. जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी नाशिक येथे झाला. कविता, नाटक, कथा, कादंबरी आणि लेखन या सर्व क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाने मराठी साहित्याला नवे वळण दिले. ‘नटसम्राट’ हे त्यांचे गाजलेले नाटक आजही रंगभूमीवर लोकप्रिय आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी ही फक्त एक भाषा नाही तर ती एक इतिहास, संस्कार आणि सांस्कृतीचे प्रतिक आहे. शतकानुशतके अमृताहूनी गोड मराठी भाषेने अभिजात भाषेचा दर्जा आणि स्वाभिमान जपला आहे. (Dinvishesh)
27 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
27 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष
27 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष






