Galaxy Buds4 vs Galaxy Buds4 Pro: कोणता Samsung ईयरबड तुमच्यासाठी ठरणार बेस्ट ऑप्शन? वाचा डिव्हाईसच्या फीचर्समधील फरक
सॅमसंगच्या दोन्ही मॉडेल्समध्ये फ्लॅट मेटल स्टेम देण्यात आले आहे, जे पहिल्या ट्रायएंगल स्टाइलहून वेगळे आणि जास्त मॉडर्न आहे. गॅलेक्सी बड्स 4 ओपन-फिट डिझाईनसह येते, ज्यांना दीर्घकाळ टिकणारा आराम हवा आहे आणि ज्यांना सिलिकॉन टिप्स आवडत नाहीत त्यांच्यासाठी आदर्श डिव्हाईस आहे. गॅलेक्सी बड्स 4 प्रोमध्ये सिलिकॉन ईयर टिप्स दिले आहे, जे अधिक चांगले फिट आणि नॉइज आइसोलेशन देतात. चार्जिंग केस दोन्हीमध्ये हॉरिजॉन्टल बेड-स्टाइल लेआउट आणि ट्रांसपेरेंट लिडसह येते. जर तुम्हाला अधिक चांगले फीट आणि साऊंड सील पाहिजे असेल तर प्रो वर्जन जास्त उपयोगी असेल. (फोटो सौजन्य – X)
दोन्ही मॉडेल्समध्ये टच कंट्रोल जसे टॅप, स्वाइप आणि पिंच जेस्चर दिले आहे. स्टेमवर इनग्रेव्ह एरिया कंट्रोल अधिक सहज केला जाऊ शकते. हेड जेस्चर कंट्रोल दोन्ही डिव्हाईसमधील मोठा फरक आहे. हे फीचर केवळ गॅलेक्सी बड्स 4 प्रोमध्ये दिले आहे. यूजर्स डोके हलवून कॉल रिसीव्ह किंवा रिजेक्ट करू शकणार आहेत. दोन्ही मॉडेल वॉयस कमांड सपोर्टसह येतात आणि गॅलेक्सी स्मार्टफोनसह सिमलेस पेअरींह देखील देते. दुभाषी मोड आणि AI चॅटबॉट सारखे काही फीचर्स गॅलेक्सी डिवाइसपर्यंतच मर्यादित आहेत. जर तुम्हाला स्मार्ट आणि हैंड्स-फ्री कंट्रोल पाहिजे असेल तर बड्स 4 प्रो एक चांगला पर्याय ठरू शकतो .
दोन्ही ईयरबड्स 24-bit / 96kHz हाई-रेज ऑडियो सपोर्टसह लाँच करण्यात आले आहेत. गॅलेक्सी बड्स 4 प्रोमध्ये ट्वीटर + वूफर सेटअप मिळतो, जो जास्त बॅलेंस्ड आणि डीप साउंड ऑफर करतो. यामध्ये इन्हांस्ड डायनॅमिक एएनसी आणि एडेप्टिव ई-क्यू देखील समाविष्ट आहे. तर गॅलेक्सी बड्स 4 मध्ये सिंगल स्पीकर सेटअप आणि एएनसी 1.0 आहे.
गॅलेक्सी बड्स 4 मध्ये IP54 रेटिंग दिली आहे तर गॅलेक्सी बड्स 4 प्रोमध्ये IP57 रेटिंग दिली आहे. प्रो मॉडेल जास्त चांगले डस्ट आणि वॉटर प्रोटेक्शन देतो.
गॅलेक्सी बड्स 4 ची किंमत 16,999 रुपये आणि गॅलेक्सी बड्स 4 प्रोची किंमत 22,999 रुपये आहे. गॅलेक्सी S26 सीरीजसर खरेदी केल्यास अतिरिक्त डिस्काऊंट देखील मिळणार आहे. जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला बेसिक एएनसी आणि चांगला आवाज हवा असेल, तर बड्स 4 हा एक चांगला पर्याय आहे. पण जर तुम्हाला प्रीमियम साउंड, चांगले एएनसी, हेड जेश्चर आणि अधिक संरक्षण हवे असेल, तर बड्स४ प्रो वर खर्च करणे शहाणपणाचे ठरेल.






